Lok sabha election 2019 पराभवाचा अंदाज आल्यानेच शरद पवारांची माघार - गडकरी

Lok sabha election 2019 पराभवाचा अंदाज आल्यानेच शरद पवारांची माघार - गडकरी

'राज ठाकरे कालही माझे मित्र होते आजही आहेत पण ते असे का वागताहेत सांगता येत नाही.'

  • Share this:

नागपूर 15 मार्च : शरद पवारांना पराभवाचा अंदाज आला असेल म्हणून किंवा राज्यसभा कायम असल्यामुळे माढ्यातून माघार घेतली असेल असं मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. पवारांच्या निवडणूक न लढण्याच्या घोषणेवरून सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा होतेय त्यावर आता नितीन गडकरींनीही मत व्यक्त करत पवारांना टोला लगावला आहे.

आणखी काय म्हणाले नितीन गडकरी?

नाना पटोले

आधी नाना पटोले यांना प्रकाश आंबेडकर मदत करतील अशा बातम्या आल्या आता आंबेडकरांचे मी नानाला फिक्स केले ही टिका करण्याचे कारण काय. विदर्भातील सर्व १० जागा जिंकू राज्यात आणखी दोन ते तीन गेल्या वेळेस पेक्षा जिंकुन आणू.

राज ठाकरे

राज ठाकरे कालही माझे मित्र होते आजही आहेत पण ते असे का वागताहेत सांगतां येत नाही.

वक्तव्यांचा विपर्यास

मी विजय माल्ल्याबद्दल बोललो ते खरे आहे पण ते मी बॅकेंसंदर्भात बोललो त्याचा अमित शहांशी कशाला जोडता. काल मी म्हणालो की तीन वेळा नापास होतो तो मंत्री होतो त्याचा संबंध हा लोकांनी स्मृती इराणी यांच्याशी कशाला जोडता. ज्यांना गोळ्या मारायच्या त्यांना थेट मारा माझ्या खांद्यावर बंदुक ठेऊन कशाला मारता .

एअर स्ट्राईक

एअर स्ट्राईकचे राजकारण आम्ही केले नाही करणार नाही.

राफेल विमान असते तर एअरस्ट्राईक दुरून करता आले असते. दीडशे किलोमीटर दुरून अतिरेक्यांच्या ठिकाणावर वार करता आला असता.

 राजकारण

मी फारसा राजकारणी नाही. माझा पक्ष माझा आहे दुसऱ्या राजकीय पक्षातही माझे मित्र आहेत. माझ्या व्यक्तीमत्वावर संघाचा आणि भारतीय विद्यार्थी परिषदेचा  पगडा. मला घराची ओढ लागली आहे आता नातवंडांची आठवण येते.

शेतकरी

शेतकऱ्यांसाठी मला एक काम करायचे ज्या दिवशी विदर्भातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्या दिवशी माझे स्वप्न पुर्ण होईल.VIDEO :

एका बुक्कीत दात पाडेन, काँग्रेस आमदाराची पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी

First published: March 15, 2019, 7:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading