• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, शिमल्यात उपचार सुरु

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली, शिमल्यात उपचार सुरु

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गडकरींना शिमला येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 • Share this:
  शिमला, 1 मे- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. गडकरींना शिमला येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नितीन गडकरी हे हिमाचल प्रदेशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले असता सभेदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. शुगर लो झाल्याने गडकरींची प्रकृती बिघडल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांना तपासून विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आता गडकरींची प्रकृती स्थीर आहे. किनौरमधील सांगला येथे प्रचारसभा आटोपल्यानंतर नितिन गडकरी कुफरीला परतत होते. यादरम्यान गडकरींची प्रकृती अचानक बिघडली.  नितिन गडकरी हे छराबडा येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिमल्याहून आयजीएमसीचे डॉक्टरांचे एक पथक तातडीने छराबडा रवाना झाली होती. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी गडकरी यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. नितीन गडकरींना शिर्डीच्या भरसभेत आली भोवळ नितीन गडकरी यांना शनिवारी (ता.27) शिर्डीच्या सभेत भोवळ आली होती. प्रखर उन्हामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. याआधीही राहुरीमध्ये विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली होती. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नितिन गडकरी आले होते. ते संबोधित करणार तेवढ्यात त्यांना भोवळ आली. ते तातडीने खुर्चीवर बसले. नंतर त्यांना बरे वाटले. नंतर त्यांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले होते. विमानतळावरही झाली होती तपासणी... शिर्डीच्या विमानतळावर डाॅक्टरांकडून गडकरींची पुन्हा तपासणी करण्यात आली होती. रक्तदाब कमी झाल्याने गडकरींना भोवळ आली होती. शरीरात पाण्याचीही कमतरतेमुळे त्यांना त्रास झाला. आता गडकरींची प्रकृती ठणठणीत असून ते विमानाने नागपूरकडे रवाना झाले. गडकरींना कॉन्व्होकेशन गाऊनमुळे गुदमरल्यासारखे झाले.. नितीन गडकरी डिसेंबर 2018 मध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात आले होते. दीक्षांत समारंभात घातलेल्या कॉन्व्होकेशन गाऊनमुळे त्याना गुदमरल्यासारखे झाल्याने भोवळ आली होती. समारंभासाठी विशिष्ट प्रकारचा गाऊन परिधान करावा लागतो. गडकरी यांनी हा पोशाख घातल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. समारंभ बंदिस्त सभागृहात असल्याने गडकरींना अस्वस्थ वाटू लागल्याने काही वेळातच त्यांना स्टेजवर भोवळ आली होती. डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली होती. शुगर व ब्लडप्रेशर सर्व काही ठीक असल्याचे सांगून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. साईबाबांचे दर्शन घेऊन ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाले होते. मोदींकडून 'हेल्थटीप्स' घ्याव्यात, संजय राऊतांनी तेव्हा दिला होता सल्ला राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात राष्ट्रगीत सुरू असताना गडकरी भोवळ येवून गडकरी स्टेजवरच कोसळले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आरोग्यासंबंधी सल्ला दिला होता. गडकरींची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हेल्थटिप्स घ्याव्यात. पंतप्रधान जगभर फिरूनदेखील त्यांची तब्येत खराब होत नाही, असा टोला राऊतांनी लगावला होता. VIDEO : गडचिरोलीत जिथे स्फोट घडला 'त्या' परिसरात पोहोचला न्यूज18 लोकमतचा प्रतिनिधी, संपूर्ण आढावा
  First published: