मी कधीच कुणाची हाजीहाजी केली नाही - गडकरी

मी कधीच कुणाची हाजीहाजी केली नाही - गडकरी

'काँग्रेसमध्ये सांगता येतं तसं भाजपमध्ये अध्यक्ष कोण होईल ते सांगता येत नाही.'

  • Share this:

नवी दिल्ली 10 मार्च  : भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांना किंमत देणार पक्ष आहे. त्यामुळेच मी पक्षाचा अध्यक्ष होऊ शकलो. मी कुणाचीही हाजीहाजी कधी केली नाही, कुणाचे कट आऊट्स लावले नाहीत, पुष्पगुच्छ कुणाला दिले नाहीत आणि बायोडाटाही कुणाला दिला नाही असं परखड मत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केलं. नागपुरात झालेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, एखाद्या चांगल्या कामासाठी कधी चुकीचं काम सुद्धा करावं लागतं मात्र वाईट कामाचं समर्थन कधीच केलं जाऊ शकत नाही. कलाकार आणि खेळाडूंना लोकाश्रय नाही आणि राजाश्रयही नाही याचं मला दुःख वाटत, मी खासदार म्हणून यांच्या साठी आयोजन सुद्धा प्रयत्न केले मात्र आणखी मदत व्हायला पाहिजे. अनेक लेखक आणि गायकांची सुद्धा परिस्थिती चांगली नाही. सर्वांनी मिळून त्यांना मदत केली पाहिजे.

ते म्हणाले, मी नागपुरात साडे तीन हजार मैदान तयार करायला सांगितली आहेत. कलाकारांसाठी सभागृह मिळविणे महाग असतं मात्र नागपुरात 5000 रुपयात सांस्कृतिक कार्यक्रमाला सभागृह उपलब्ध करायला सांगितलं आहे.

अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी नेशनल लेव्हल वर काम केलं मात्र त्यांच्या म्हातारं वयात दोन वेळच जेवण सुद्धा मिळत नाही यामुळे या क्षेत्राला राजाश्रय  देण्याची गरज आहे तरच देशात चांगले कलाकार आणि खेळाळू घडतील.

सांस्कृतिक आणि खेळाच्या क्षेत्रात किती अडचणी असतात या मी जवळून अनुभवलं आहे त्यामुळे या बद्दल मला या क्षेत्रात चांगलं काम व्हावं अस वाटत मी गाणं म्हटलं असत मात्र पुढे मीडिया वाले आहे त्यामुळे मी म्हणू शकत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.  मी गायक नाही मात्र मला एक स्पर्धेत पुरस्कार मिळाला होता.

First published: March 10, 2019, 10:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading