• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं
  • VIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं

    News18 Lokmat | Published On: Jan 20, 2019 07:39 PM IST | Updated On: Jan 20, 2019 07:41 PM IST

    नागपूर, 20 जानेवारी : नितीन गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी पत्रकं भिरकावल्याची घटना घडली आहे. नागपुरात भाजपनं आयोजित केलेल्या अनुसूचित जाती वर्गाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये नितीन गडकरी भाषण करत होते. यावेळी स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्या तरूणांनी घोषणाबाजी करत पत्रकं भिरकावली. पोलिसांनी सात तरूणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत नितीन गडकरींनी भाषण सुरूच ठेवलं. वेगळ्या विदर्भाची मागणी योग्य आहे. मात्र, विदर्भाला वेगळं राज्य बनवल्यास विकास होणार का? असा सवाल नितीन गडकरींनी काही दिवसांपूर्वी भाषणात उपस्थित केला होता. त्याच्या निषेधार्थ तरूणांनी पत्रकं भिरकावल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading