गडकरी 'त्या' वक्तव्यावर अजूनही ठाम; म्हणतात, '...तर देशाचे 40 हजार कोटी वाचतील'

गडकरी 'त्या' वक्तव्यावर अजूनही ठाम; म्हणतात, '...तर देशाचे 40 हजार कोटी वाचतील'

'युरीन पासून युरीया, या माझ्या कल्पनेवर लोकं हसले, पण त्यांना हसू द्या.'

  • Share this:

नागपूर, 9 मार्च : 'युरीन पासून युरीया, या माझ्या कल्पनेवर लोकं हसले, पण त्यांना हसू द्या. देशातील प्रत्येकाने आपली युरीन साठवली आणि त्यापासून युरीया तयार केल्यास देशाचे 40 हजार कोटी वाचतील,' असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

'देशात साखर अतिरिक्त आहे. डाळ अतिरिक्त आहे, तांदूळ अतिरिक्त आहे. म्हणून शेतमालाला भाव मिळत नाही. सरकार कुणाचंही येवो, परिस्थिती तीच आहे,' असंही गडकरी म्हणाले. नागपुरातील सरपंच सम्राट पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

काय म्हणाले गडकरी ?

सरकारी वाहनांमधील डिझेल चोरीला जात असल्याचं वास्तव सांगत पुन्हा गडकरींनी सरकारी कर्मचाऱ्यांवर निशाना साधला.

नेते बदल्या करण्यात भिडून आहे, बदल्या करणे नेत्यांचं आवडतं काम आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा घरचा आहेर दिला आहे. 'गावात डाॅक्टर नाही, डाॅक्टर असला तर नर्स नाही, दोन्ही असले तर औषध नाही. मग कोण मरायला जाईल त्या दवाखान्यात’ असं म्हणत गडकरी यांनी गावातील परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

उंदराने चोरले कोट्यवधींचे हिरे, CCTV VIDEO व्हायरल

First published: March 9, 2019, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading