मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पंढरपुरात राजकीय नेत्यांची वारी, एकाच व्यासपीठावर ठाकरे, गडकरी, पवार आणि फडणवीस येणार

पंढरपुरात राजकीय नेत्यांची वारी, एकाच व्यासपीठावर ठाकरे, गडकरी, पवार आणि फडणवीस येणार

 संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे (Sant Tukaram Maharaj Palkhi Highway) भूमिपूजन पंढरपुरात होणार आहे. या कार्यक्रमाला ...

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे (Sant Tukaram Maharaj Palkhi Highway) भूमिपूजन पंढरपुरात होणार आहे. या कार्यक्रमाला ...

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे (Sant Tukaram Maharaj Palkhi Highway) भूमिपूजन पंढरपुरात होणार आहे. या कार्यक्रमाला ...

पंढरपूर,24 ऑक्टोबर : एकमेकांवर टीकेची एकही संधी न सोडणारे महाविकास आघाडी सरकार (mva government) आणि भाजपचे (bjp) नेते एकाच व्यासपीठावर येणार आहे.  पंढरपूर (pandharpur) ते आळंदी (aalandi) या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि देहू ते पंढरपूर (pandharpur) या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे (Sant Tukaram Maharaj Palkhi Highway) भूमिपूजन पंढरपुरात होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) या कार्यक्रमाला हजर राहणार आहे.

येत्या 30 ऑक्टोबर रोजी पंढरपुरात सकाळी 11 वाजता राष्ट्रीय पालखी महामार्गाचे भूमिपूजन होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संतमंडळींच्या हस्ते या राष्ट्रीय पालखी महामार्गाचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी यांनी दिली.

3 महिन्याच्या बहिणीचा गळा दाबून अल्पवयीन भावाने मृतदेह पिशवीत टाकून नदीत फेकला

दरवर्षी लाखो भाविक आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या पायी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, या साठी या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे. कोरोनामुळे भूमिपूजन कार्यक्रम घेता आला नाही. त्यानंतर आता येत्या 30 ऑक्टोबर रोजी पंढरपुरातील रेल्वे मैदानावर भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी दहा हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे.

परीक्षेत विद्यार्थ्याने लिहिलं अस्सं उत्तर;टीचरला सहन झाला नाही धक्का, थेट कोमात

या कार्यक्रमासाठी राज्यभरातील प्रमुख संत मंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते पालखीमार्गाचे भूमिपूजन केले जाणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.

First published:

Tags: Pandharpur