सत्तेत असूनही सत्ताधारी विरोधकांसारखे वागतात-गडकरींचा मुख्यमंत्र्यांना टोला

सत्तेत असूनही सत्ताधारी विरोधकांसारखे वागतात-गडकरींचा मुख्यमंत्र्यांना टोला

विरोधक सत्ताधारी झाल्यामुळे त्यांना सत्ता बोचते आहे अशा शब्दात गडकऱ्यांनी फटकेबाजी केली.

  • Share this:

27 ऑक्टोबर: आज महाराष्ट्रात सत्ताधारी विरोधकांसारखे वागतात अशा शब्दात नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. विरोधक सत्ताधारी झाल्यामुळे त्यांना सत्ता बोचते आहे अशा शब्दात गडकऱ्यांनी फटकेबाजी केली. ते  दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्टी समारंभात बोलत होते.तसंच दिलीप वळसे पाटीलांनी दोन्हीतला समतोल साधला हेही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा आज एकसष्ठी गौरव समारंभ आहे. या समारंभाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार अशोक चव्हाण हे एकाच व्यासपीठावर आहेत. याचबरोबर मंत्री दिवाकर रावते, अजित पवार, सुनिल तटकरे, शेकापचे जयंत पाटील हे उपस्थित आहेत.प्रत्येक नेत्याने त्यांच्याबद्दल  आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

राजकारणातले सगळे सद्गुण दिलीप वळसे पाटलांकडे-मुख्यमंत्री

या कार्यक्रमात आज अनेक मान्यवरांनी वळसे पाटीलांबद्दल आपली मतं व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. 'ज्यांच्या ६१ ला मी पोहचू न शकल्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या त्या सुनिल तटकरेंना आज शुभेच्छा देतो' असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दिलीप वळसे पाटील यांचा सत्कार करताना मी शाल घातली, गडकरींनी पुष्पगुच्छ दिला आणि पवारांनी त्यांच्या हातात महाराष्ट्र दिला. ही नवी इंनिंग दिलीप वळसे पाटीलांची सुरू झाली' या शब्दात मुख्यमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटिलांनी प्रशंसा केली. तसंच त्यांच्या उर्जा क्षेत्रातील योगदानाचं कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केलं. राजकारणातले सर्व सदगुण दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले.खाजगी विद्यापीठांची मूऎल संकल्पना दिलीप वळसे पाटील यांची असंही मुख्यमंत्री म्हणाले. तर विधानसभा त्यांनी समृद्ध केली असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी कबुल केलं.

वळसे पाटलांनी एक पक्ष कायम ठेवला-अशोक चव्हाण

तर याप्रसंगी अशोक चव्हाणांनी वळसे पाटीलांची तारीफ करताना पक्ष बदलणाऱ्या दिग्गज नेत्यांना टोला लगावला. ते म्हणाले, ' शरद पवारांनी एक राजकीय पिढी घडवली. माझी राजकीय कारकीर्द सुध्दा पवारांकडेच झाली. लोक निवडून येतात पण संधी कोण देत हे महत्त्वाचं असतं. वळसे पाटील यांनी एकच पक्ष कायम ठेवला. नाहीतर हल्ली खूप सोपं झालंय सगळं.'

प्रवाहाविरूद्ध एका दिशेने वाहत राहणारा मासा म्हणजे दिलीप वळसे पाटील-नितीन गडकरी

यानंतर नितीन गडकरी बोलण्यास उभे राहिले. नितीन गडकरींनी देखील दिलीप वळसे पाटील यांच्या एकनिष्ठतेची स्तुती केली. वळसे पाटलांना त्यांनी प्रवाहाविरूद्ध वाहणाऱ्या माश्याची उपमा दिली. राजकारणात संयम ठेवून एका नेतृत्वासोबत राहणं हे खूप आवश्यक असतं असंही गडकरींनी सांगितलं. तर इतर राज्यात लोकं १०० टक्के राजकारण करतात. पण महाराष्ट्रात समाजकारण, राष्ट्रकारण, राजकारण याचा वारसा आहे. लोक जेव्हा विचारतात तुम्ही का रिटायर्ड होताय तेव्हा रिटायर्ड होण्यात मजा आहे. तुम्ही केव्हा रिटायर्ड होताय हे विचारल्यावर रिटायर्ड होण्यात मजा नाही. असं सुनिल गावसकरने म्हटलं होतं. राजकारणात योग्यवेळी रिटायर्ड देऊन नवीन पिढीला संधी दिली पाहीजे अशीही सूचक वक्तव्य गडकरी यांनी केलं. तसंच सत्ताधारी विरोधकांसारखे वागतात. आणि आज विरोधक सत्तेत आल्यामुळे त्यांना सत्ता बोचते असा टोलाही गडकऱ्यांनी भाजपतील काही नेत्यांना आणि शिवसेनेला लगावला.

शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

अनेकांनी सांगितलं पक्षात घडवलेले अनेक लोक सोडून गेले. ते खरं आहे. एकदा आमचे ६० आमदार आमचे निवडून आले होते. मी बाहेर होतो मी आल्यावर कळलं ६ सोडून सगळे गेले.महाराष्ट्रात नेतृत्वाची एक फळी निर्माण केली अशा शब्दात शरद पवारांनी त्यांचं कौतुक केलं. तसंच त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.भीमाशंकरच्या आठवणी तसंच मुख्यमंत्री असताना वळसे पाटील यांच्या सोबत काम करतानाच्या आठवणींबद्दलही पवारांनी  भावूक होऊव सांगितलं.

स्वत: दिलीप वळसे पाटील यांनीही यावेळी सगळ्यांचे आभार मानले. पवारांनी आशीर्वाद दिला त्यातून जे घडलं ते मी आज आहे अशा शब्दात त्यांनी पवारांना धन्यवाद दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 02:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading