रायगड, 30 मार्च : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकतेच गडकरी म्हणाले की, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला मत द्या, नाहीतर नका देऊ. आता जास्त लोणी लावायला मी तयार नाही. तुम्हाला योग्य वाटलं तर ठीक, नाहीतर कोणी दुसरा येईल. गडकरींच्या या वक्तव्यामुळे ते राजकाणातून निवृत्त होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, यावर आता खुद्द नितीन गडकरी यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणातून निवृत्त होण्याचा कुठलाही विचार नाही, मीडियाने जबाबदारीने बातम्या द्याव्या, असं गडकरी म्हणाले आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते कासु या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भुमीपुजन गडकरी यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले होते गडकरी?
विकास कामांशिवाय गडकरींच्या वक्तव्यांची चर्चाही नेहमी होत असते. आता नागपूरमधील एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमात त्यांनी बेधडक वक्तव्य केलं. तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या, नाहीतर नका देऊ. मी आता जास्त लोणी लावायला तयार नाही. तुम्हाला वाटलं तर ठीक, नाहीतर कोणीतरी नवा येईल असं गडकरी म्हणाले.
महामार्गावरील ब्लॅकस्पॉट आयडेंटीफाय करा, मंत्री नितीन गडकरी यांचे अवाहन
महामार्गांवर अपघातांचे प्रमाण मोठे आहे. लोक प्रतिनिधींनी हे ब्लॅक स्पॉट आडेंटीफाय करावेत अशी विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रायगडमध्ये केली. कोव्हिड, युद्धामध्ये मरत नाहीत त्यापेक्षा जास्त लोक रस्ते अपघातात मरतात. या बद्दल दुःख व्यक्त करीत लेन डिसिल्पिनचं महत्व गडकरी यांनी सांगितले. यापुढे टोल नाके आता रद्द करणार असून सॅटेलाईट बेस टोल नाके सुरु करण्याची संकल्पना यावेळी गडकरी यांनी बोलुन दाखवली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रायगड दौर्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते कासु या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भुमीपुजन केले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
वाचा - भावी मुख्यमंत्री अजितदादा.. बॅनर पाहून जितेंद्र आव्हाड म्हणतात, निवडणुका लागुद्या मग..
नितीन गडकरींची अशी वक्तव्ये काही नवी नाहीत. त्यांनी याआधीही केलेल्या अशा वक्तव्यांची नेहमी चर्चा झाली. पण जेव्हा गडकरी असे बोलतात त्यावेळी राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जातात. नितीन गडकरी नाराज आहेत किंवा पक्ष गडकरींबाबत कठोर आहे वगैरे चर्चा सुरू होतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nagpur, Nitin gadkari