VIDEO: आधी नेहरू आता इंदिरा गांधींचं कौतुक... पाहा काय म्हणाले नितीन गडकरी?

VIDEO: आधी नेहरू आता इंदिरा गांधींचं कौतुक... पाहा काय म्हणाले नितीन गडकरी?

भाजपच्या अनेक नेत्यांकडून गांधी घराण्यावर सातत्याने टीका होत असते. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • Share this:

नागपूर, 7 जानेवारी : 'इंदिरा गांधी यांनी अनेक ताकदवान नेत्यांना झुकवलं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं,' असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कौतुक केलं आहे. याआधी नितीन गडकरींनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचंही कौतुक केलं होतं.

'माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी आपल्या पक्षातील निष्ठावान पुरूष नेत्यांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. अशा या कर्तृत्ववान महिलेनं आरक्षणाचा लाभ घेतला होता का?', असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंदिरा गांधी या महिला सक्षमीकरणाच्या आदर्श असल्याचं सांगितलं.

नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात महिला बचत गटाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण या विषयावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

भाजपच्या अनेक नेत्यांकडून गांधी घराण्यावर सातत्याने टीका होत असते. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

VIDEO : विजयाचे बाप अनेक असतात, पराभव अनाथ असतो -नितीन गडकरी

First published: January 7, 2019, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading