• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'बाकीची भाषण देतात, गडकरी काम करतात'; बच्चू कडूंनी उधळली स्तुतीसुमने

'बाकीची भाषण देतात, गडकरी काम करतात'; बच्चू कडूंनी उधळली स्तुतीसुमने

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरींवर बच्चू कडू यांनी ही स्तुती सुमने उधळल्याचं आज पहायला मिळालं.

 • Share this:
  बुलडाणा, 15 ऑगस्ट : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकांकडून होत असलेल्या आडकाठी माहिती दिली होती. यामुळे राजकीय वातावरण तापले होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मंत्री असलेले बच्चू कडू (bacchu kadu) यांनी आज नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. आज बुलडाणाच्या शेगावमध्ये राज्य मंत्री बच्चू कडू आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितीन गडकरींवर बच्चू कडू यांनी ही स्तुती सुमने उधळल्याचं आज पहायला मिळालं. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी जागा रिक्त 'केंद्रातील वरिष्ठ नेत्यांवर बोलताना बाकीचे भाषण करतात, आणि नितीन गडकरी काम करतात', असा टोला लगावत नितीन गडकरींवर बच्चू कडू यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत. तसंच, '17 तारखेपासून सुरू होणाऱ्या शाळांच्या निर्णयाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे.  17 तारखेला शाळा सुरू होणार असे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या निर्णयाला थांबवत सध्या शाळा सुरू होणार नाहीत, अशा सूचना केल्या.

  ...तोपर्यंत आपल्याला चीनसमोर झुकावे लागणार, मोहन भागवतांचे मोठे विधान

  बच्चू कडू यांनी सांगितलं की, 17 तारखेला शाळा सुरू होणार यावर काही मंत्री आणि आरोग्य विभागाचा आक्षेप होता. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी शाळा बंद चा निर्णय घेतला आहे, असं वक्तव्य बचू कडू यांनी केलं. कॉंग्रेस नितीन गडकरी यांच्या पाठीशी - नाना पटोले दरम्यान, नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकांची तक्रार केली आहे. या पत्रावर न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला. 'नितीन गडकरी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले आहे, ते दिल्लीच्या नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही हा प्रश्न उपस्थित होतो. कारण, गेली 25 वर्ष हे दोन्ही पक्ष सोबत होते. तेव्हा यांना काही अडचण नव्हती' अशी शंका नाना पटोलेंनी व्यक्त केली. तसंच, 'राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोणी अडथडा आणत असेल तर कॉंग्रेस नितीन गडकरी यांच्या पाठीशी आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेला भष्ट्राचार व कामाचा निकृष्ठ दर्जा हे व्यवस्थित करावे व याची श्वेत पत्रिका काढावी' अशी मागणी पटोले यांनी केली.
  Published by:sachin Salve
  First published: