राजकारण्यांनी सांस्कृतिक संस्थामध्ये हस्तक्षेप करू नये - नितीन गडकरी

राजकारण्यांनी सांस्कृतिक संस्थामध्ये हस्तक्षेप करू नये - नितीन गडकरी

'राज्याच्या बाहेर आपण जो पर्यंत जात नाही तो पर्यंत मराठी भाषेचे मोठेपण जोपर्यंत कळत नाही.'

  • Share this:

यवतमाळ 12 जानेवारी : वादामुळे गाजलेल्या यवतमाळ इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समारोपाच्या भाषणात सरकारचे कान टोचले आणि राजकारण्यांना दोन शब्दही सुनावले. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना न बोलावण्यामुळे जो वाद झाला होता तो धागा पकडून गडकरी यांनी मतभेद असावेत मनभेद नसले पाहिजे असं स्पष्ट केलं.

ते म्हणाले, "राजकारण्यांनी साहित्य आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करू नये. पण त्याच बरोबर राजकारण्यांना सांस्कृतिक व्यासपीठ वर्जही असता कामा नये. मतभेद असायला काहीच हरकत नाही मात्र त्यांचे मनभेद असता कामा नये. साहित्यिक हे समाजाचे मार्गदर्शक आहेत असंही त्यांनी सांगितलं."

गडकरींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

राज्याच्या बाहेर आपण जो पर्यंत जात नाही तो पर्यंत मराठी भाषेचे मोठेपण जोपर्यंत कळत नाही.

राजकारणी लोकांनी  साहित्य, शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप करू नये.

साहित्यिकांकडून काय शिकता येईल, सरकार म्हणून साहित्यिकांसाठी काय  करता येईल हे जाणून घेण्यासाठी संमेलनात आलो आहे.

कुठलाही माणूस हा धर्माने, जातीने मोठा होत नाही हे खरे असले तरी जी जात नाही ती जात आहे.

राजकारणात फक्त मीच शहाणा आहे अशी परिस्थिती आहे. फक्त मी शहाणा इतर मुर्ख असं समजलंत तर प्रगती होणार नाही.

युद्धभूमीवरून हरल्यावरून कुणी संपत नाही तर माघार घेतल्याने आपण हरतो हे निवडणूक हरलेल्या आमच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना मी सांगितले.

 काम केले तरच मत द्या नाही तर देऊ नका असं मी लोकांना सांगतो. सत्ताकारण म्हणजेचे राजकारण असे काही आज झाले ते योग्य नाही.

मंत्रीपद मिळालं नाही तर माणूस मरत नाही असं मी राजकारण्यांना सांगत असतो.

एखादी गोष्ट यश्वस्वी व्हायची असेल तर अनेकांचे हात लागतात पण ते अयशस्वी होण्यासाठी एखाद्या व्यक्तींचे प्रयत्न होतात.

First published: January 13, 2019, 6:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading