नितीन गडकरींना शिर्डीच्या भरसभेत आली भोवळ; नंतर घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

नितीन गडकरींना शिर्डीच्या भरसभेत आली भोवळ; नंतर घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन

शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नितिन गडकरी आले होते. ते संबोधित करणार तेवढ्यात त्यांना भोवळ आली.

  • Share this:

हरिष दिमोटे (प्रतिनिधी)

शिर्डी, 27 एप्रिल- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना शनिवारी शिर्डीच्या सभेत भोवळ आली. प्रखर उन्हामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. थोड्या वेळात त्यांना बर वाटले. याआधीही राहुरीमध्ये विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात  गडकरींना भोवळ आली होती.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ नितिन गडकरी आले होते. ते संबोधित करणार तेवढ्यात त्यांना भोवळ आली. ते तातडीने  खुर्चीवर बसले.  नंतर त्यांना बर वाटले. सभास्थान वरून ते साईबाबांच्या समाधी दर्शनाकरिता मंदिरात रवाना झाले. मंदिरात दर्शन केल्यानंतर थोड्याच वेळात नागपूरकडे रवाना होणार आहेत. त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत असून, काळजी करण्याचे कारण नाही. ज्या हितचिंतकांनी या काळामध्ये विचारपूस केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

विमानतळावर गडकरींची पुन्हा तपासणी...

शिर्डीच्या विमानतळावर डाॅक्टरांकडून गडकरींची पुन्हा तपासणी करण्यात आली. रक्तदाब कमी झाल्याने  गडकरींना भोवळ आली होती. शरीरात पाण्याचीही कमतरतेमुळे त्यांना त्रास झाला. आता गडकरींची प्रकृती ठणठणीत असून ते विमानाने नागपूरकडे रवाना झाले.

गडकरींना कॉन्व्होकेशन गाऊनमुळे गुदमरल्यासारखे झाले..

नितीन गडकरी डिसेंबर 2018 मध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात आले होते. दीक्षांत समारंभात घातलेल्या कॉन्व्होकेशन गाऊनमुळे त्याना गुदमरल्यासारखे झाल्याने भोवळ आली होती. समारंभासाठी विशिष्ट प्रकारचा गाऊन परिधान करावा लागतो. गडकरी यांनी हा पोशाख घातल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. समारंभ बंदिस्त सभागृहात असल्याने गडकरींना अस्वस्थ वाटू लागल्याने काही वेळातच त्यांना स्टेजवर भोवळ आली होती. डॉक्टरांनी तातडीने तपासणी केली होती. शुगर व ब्लडप्रेशर सर्व काही ठीक असल्याचे सांगून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. साईबाबांचे दर्शन घेऊन ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाले होते.

मोदींकडून 'हेल्थटीप्स' घ्याव्यात, संजय राऊतांनी तेव्हा दिला होता सल्ला

राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात राष्ट्रगीत सुरू असताना गडकरी भोवळ येवून गडकरी स्टेजवरच कोसळले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आरोग्यासंबंधी सल्ला दिला होता. गडकरींची प्रकृती लवकर सुधारावी, यासाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हेल्थटिप्स घ्याव्यात. पंतप्रधान जगभर फिरूनदेखील त्यांची तब्येत खराब होत नाही, असा टोला राऊतांनी लगावला होता.

VIDEO : भरसभेत नितीन गडकरींना आली भोवळ

First published: April 27, 2019, 5:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading