मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपचं धक्कातंत्र, राज्याचे पुढचे मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे? गडकरींच्या 'त्या' विधानाने चर्चांना उधाण

भाजपचं धक्कातंत्र, राज्याचे पुढचे मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे? गडकरींच्या 'त्या' विधानाने चर्चांना उधाण

चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फाईल फोटो

चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फाईल फोटो

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल? याचा काहीच भरोसा नाही. याची प्रचिती देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 14 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल? याचा काहीच भरोसा नाही. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तत्त्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, अशी दाट शक्यता होती. पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी न देता उपमुख्यमंत्री होण्याचा आदेश दिला. देवेंद्र फडणवीसांसाठी हा धक्का होता. हा धक्का ताजा असतानाच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना दुसरा धक्का बसला आहे. चंद्रकांत पाटलांना राज्याच्या महसूलमंत्रीपदाची जबाबदारी हवी होती. पण ती त्यांना न देता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली. चंद्रकांत पाटलांना उच्च व तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी दिली. भाजपचं हेच धक्कातंत्र पुढचे काही वर्ष सुरु राहीलं तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विराजमान होऊ शकतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच एका कार्यक्रमात याबाबतचं सूचक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने विविध चर्चांना उधाण आलं आहे. "आपल्यातला एक कार्यकर्ता आज महाराष्ट्रातलं नेतृत्व करत आहे. जो प्रदेशाचा अध्यक्ष होतो तो पुढे काय-काय होतो ते तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या शुभेच्छा देत नाहीय. मुख्यमंत्री फडणवीसच झाले पाहिजेत. पण फडणवीस देशात गेले तर नंतर मुख्यमंत्री म्हणून बावनकुळे तुमचाही विचार होऊ शकतो", असं सूचक विधान नितीन गडकरी यांनी केलं. ('सगळ्यात मोठी बेईमानी आमच्यासोबत', अडीच वर्षांच्या फॉर्म्युलावर फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा) "आपल्या सगळ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की आपल्या बरोबर काम करणारा कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष झाला आहे. मी नेहमी म्हणतो की आपला पक्ष हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे. इथे आमदाराच्या पोटी आमदार, खासदारांच्या पोटातून खासदार, पंतप्रधानाच्या पोटातून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याच्या पोटातून मुख्यमंत्री जन्माला येत नाही. एखाद्याचं मुलगा किंवा मुलगी असणं हा गुन्हा नाहीय. त्यांनादेखील अधिकार आहे. त्यांनी देखील आपल्या कर्तृत्वाने मोठी जागा मिळवायला कोणतीही अडचण नाही", अशा शब्दांत गडकरींनी बावनकुळेंचं कौतुक केलं. "कार्यकर्ते दोन प्रकारचे असतात. काही फार हुशार असतात, मेहनत करत नाहीत, पण फोटोत बरोबर येतात. चंद्रशेखर बावनकुळे हे मेहनत आणि परिश्रम करुन संपूर्ण झोकून देवून काम करणारा जिद्दीचा कार्यकर्ता आहे", असं गडकरी म्हणाले. "तुमच्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा तुम्ही कसे वागता? हीच कार्यकर्त्याची सर्वात मोठी परीक्षा असते. या सगळ्या काळात आपल्याला तिकीट मिळालं नाही तरीसुद्धा सर्व आमदारांना निवडून आणण्याकरता कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता पूर्ण ताकदीने पक्षाच्या यशासाठी काम केलं. विदर्भात आणि पूर्ण महाराष्ट्रात फिरले. त्यांनी तक्रार नाही केली. ते कार्यकर्त्याच्या परीक्षेत उत्तम उत्तीर्ण झाले", असं मत गडकरींनी मांडलं.
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis

पुढील बातम्या