Home /News /maharashtra /

नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल एकाच व्यासपीठावर, राजकीय चर्चांना उधाण

नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल एकाच व्यासपीठावर, राजकीय चर्चांना उधाण

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

    रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया, 29 मे : राज्यसभा निवडणुकीमुळे (rajya sabha election 2022) जोरदार रस्सीखेच पाहण्यास मिळाला. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला होता. तर दुसरीकडे, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel ) आज गोंदियात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गोंदिया जिल्हामध्ये आज केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 आमगाव ते गोंदिया 22 किलोमिटर सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम, किडगीपर येथे रेल्वे उडण पुल, गोंदिया शहरात गड्डाटोली येथे रेल्वे उडाण पुल आणि गोंदिया शहरात बस स्थानकापासून कटंगीपर्यंत रेल्वेवर उडाणपुलांचे  बांधकामाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे,  यावेळी नितीन गडकरी यांनी गोंदिया जिल्हा करिता अनेक विकासाच्या योजना त्यांनी घोषित केल्या आहे. (IPL 2022 Final मध्ये पाऊस आला तर कोण होणार चॅम्पियन? पाहा काय आहे नवा नियम) महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र सरकारने पैसे घेतले.  गोंदिया हे महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याात सहा महिन्यात मेट्रो ट्रेन धावणार आहे. गोंदिया शहराला चारही बाजूने रिंग रोड तयार करणार आहोत,  असं आश्वासन गडकरींनी दिलं. तसंच, पहिंल्यादा मला साखर कारखान्यात फायदा झाला आहे. जे लोक पाप करतात त्यांच्या नशिबी साखर कारखाने येतात, असं म्हणत गडकरींनी राष्ट्रवादीला टोला लगावला. (विदर्भातील शेतकऱ्यांनी 'या' शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा जयंत पाटील असे का म्हणाले) रशिया युक्रेन युद्धामुळे भारताचा फायदा झाला पाहिन्यादा तांदूळ एक्स्पोर्ट वाढला आहे. तसंच, विदर्भाच्या कापसाला बांगलादेशात मागणी वाढली आहे त्यामुळे विदर्भाचा विकास होणार आहे, असंही गडकरी म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या