शहा आणि उद्धव यांच्या त्या हायव्होल्टेज बैठकीत नेमकं काय घडलं होतं? गडकरींनी केला खुलासा

शहा आणि उद्धव यांच्या त्या हायव्होल्टेज बैठकीत नेमकं काय घडलं होतं? गडकरींनी केला खुलासा

गडकरी यांनी लोकसभेपूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत नेमकं काय झालं होतं, याबाबत सविस्तर खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 8 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद हा दावा खोडून काढला. त्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही लोकसभेपूर्वी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत नेमकं काय झालं होतं, याबाबत सविस्तर खुलासा केला आहे.

'लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा यांच्यासोबतच्या झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्यात यावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर अमित शहा यांनी निवडणुकीनंतर पाहू असं उत्तर दिलं होतं. मात्र कोणताही निर्णय घेतला नव्हता,' असा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेला समसमान सत्तावाटपाचा शब्द पाळावा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपकडे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. पण आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानाने उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का बसला आहे.

नितीन गडकरी कोंडी फोडणार?

भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेचा तिढा असताना नितीन गडकरी यांची नेमकी काय भूमिका असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर काल गडकरींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूर इथं भेट घेतली. या पार्श्वभूमीवर राजकीय कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणार का, हे पाहावं लागेल.

दरम्यान, महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपसमोर आव्हान निर्माण झालं असताना भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा मात्र या सगळ्यापासून दूर असल्याचं दिसत आहे. अशातच एक नवी माहिती समोर आली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपलं पूर्ण लक्ष सध्या राम मंदिर आणि नागरिक दुरुस्ती विधेयक या दोन मुद्द्यांवर केंद्रीत केलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

VIDEO : युती तुटली का? देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 06:17 PM IST

ताज्या बातम्या