Home /News /maharashtra /

'त्यांच्या घरात कोण कुणासोबत...' महाविकास आघाडीवर टीका करताना नितेश राणेंनी जीभ घसरली

'त्यांच्या घरात कोण कुणासोबत...' महाविकास आघाडीवर टीका करताना नितेश राणेंनी जीभ घसरली

 तुळजाभवानी देवीच्या मंदिरातच नितेश राणे यांनी राष्टवादीवर अश्लील भाषेत टीका केली आहे.

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातच नितेश राणे यांनी राष्टवादीवर अश्लील भाषेत टीका केली आहे.

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातच नितेश राणे यांनी राष्टवादीवर अश्लील भाषेत टीका केली आहे.

उस्मानाबाद, 21 मार्च : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीला युतीची ऑफर दिल्यामुळे एकच राजकीय चर्चा रंगली आहे. तर महाविकास आघाडी व एमआयएमच्या (mim) युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार नितेश राणे यांची जीभ घसरली आहे. तुळजाभवानी देवीच्या मंदिरातच नितेश राणे (nitesh rane) यांनी राष्टवादीवर अश्लील टीका केली आहे. आमदार नितेश राणे हे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेवून देवीचा धार्मिक कुलाचार केला. यावेळी  माध्यमांशी बोलत असताना महाविकास आघाडीवर टीका कली. (The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीचे सेनेच्या आरोपाला शिवसेना स्टाईल उत्तर) 'लग्नाचा प्रस्ताव एमआएएमने दिला आहे, तो स्विकारावा का नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या घरात कोण कुणासोबत झोपतंय हा आमचा प्रश्न नसून भाजप स्वबळावर 2024 मध्ये सत्ता स्थापन करेल' असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं. तसंच, 'उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याची धमक देवेंद्र फडणवीस यांच्यातच आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यावर आम्ही हे करून दाखवू, असंही  नितेश राणे म्हणाले. (Chromeयुजर्ससाठी सरकारकडून हाय रिस्क अलर्ट,वापरत असाल तर लगेच करा महत्त्वाचं काम) दाऊदची बी टीम महाराष्ट्राच्या सरकारमध्ये राज्य करते म्हणून नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही. मलिक यांचा राजीनामा जर घेतला तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्याचे  दाऊदला उत्तर द्यावे लागेल अशी टिप्पणी आमदार नितेश राणे यांनी केली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या