मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसैनिकावर हल्ला प्रकरणात मला अडकवण्याचा डाव, नितेश राणेंचा आरोप

शिवसैनिकावर हल्ला प्रकरणात मला अडकवण्याचा डाव, नितेश राणेंचा आरोप

सिंधुदुर्ग बँक निवडणुकीच्या निमित्ताने कणकवलीमध्ये राजकीय वातावरण ढवळून गेले आहे.

सिंधुदुर्ग बँक निवडणुकीच्या निमित्ताने कणकवलीमध्ये राजकीय वातावरण ढवळून गेले आहे.

सिंधुदुर्ग बँक निवडणुकीच्या निमित्ताने कणकवलीमध्ये राजकीय वातावरण ढवळून गेले आहे.

  • Published by:  sachin Salve
सिंधुदुर्ग, 26 डिसेंबर :  सिंधुदूर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election 2021)  कणकवलीत शिवसैनिक संतोष परब प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या हल्ल्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचे नेते मला गोवण्याचा डाव रचला आहे, असा आरोप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. तर नारायण राणे (narayan rane) यांनी मुलावर होत असलेल्या आरोपावरून महाविकास आघाडी सरकारला (mva government) इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग बँक निवडणुकीच्या निमित्ताने कणकवलीमध्ये राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. संतोष परब या शिवसैनिकावर हल्ला झाल्यामुळे नितेश राणे यांना दोन वेळा पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागली. आता नितेश राणे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला आहे. 'सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजप प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मतदारांकडून उत्साहवर्धक वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मला संतोष परब हल्ल्यातील केसमध्ये गुंतवत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या या हल्ल्याबाबत सुरू असलेल्या चौकशीवरून मला या गुन्ह्यात अडकवत असल्याचे दिसून येत आहे' असा दावाच राणेंनी केला आहे. तसंच, ज्याप्रमाणे मागील 2 वर्षे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर चुकीच्या केस टाकल्या जात आहेत तसाच अनुभव मलाही सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत येत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - ओव्हरटेकच्या नादात क्रुझर आणि कारची समोरासमोर धडक, 4 जण ठार) तर दुसरीकडे, वडील नारायण राणे यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. 'कणकवली येथील एका कार्यकर्त्याच्या हल्ल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांना गोवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत आहे.  सत्तेचा गैरवापर करून सूडबुद्धीने राजकारण केले  जात आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. तसंच,  अशा प्रकारचे अटकसत्र सुरू राहिल्यास सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाईल असा इशारा त्यांनी  दिला. नितेश राणेंना अटक करा, शिवसेनेची मागणी तर, संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक करावी. नितेश राणे भाजपचे आमदार आहेत किंवा केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून त्याला वेगळा न्याय पोलिसांनी देऊ नये अन्यथा शिवसेना कणकवलीत आंदोलन करेल, असा इशारा शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिला. काय घडलं नेमकं? सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुक प्रचारात १८ डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक केली. मुख्य आरोपी सचिन सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला केल्यानंतर सचिन सातपुते त्याचा मोबाईल फोन बंद करून फरार झाला होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. मात्र तरीही सिधुदूर्ग ग्रामिण पोलिसांनी तपास वेगवान करून मोठ्या शिताफीने सचिन सातपुतेला अटक केली. मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिधुदुर्ग ग्रामीण पोलीस आज कणकवली किंवा कुडाळ पोलीस स्टेशनला हजर करणार असल्याचीही माहिती मिळतेय. याच प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांची दोन दिवस कणकवली पोलिसांनी चौकशीही केली आहे.
First published:

पुढील बातम्या