Home /News /maharashtra /

Nitesh Rane : सेशन्स कोर्ट, हायकोर्टाने जामीन फेटाळला, नितेश राणेंच्या पोलीस ठाण्यात येरझारा, सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

Nitesh Rane : सेशन्स कोर्ट, हायकोर्टाने जामीन फेटाळला, नितेश राणेंच्या पोलीस ठाण्यात येरझारा, सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

सिंधुदुर्ग पोलिसांनी नितेश राणे यांना 24 ते 27 जानेवारीपर्यंत पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. या समन्सनुसार नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यात तीन दिवसांपासून हजेरी लावत आहेत.

    विशाल रेवडेकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग, 26 जानेवारी : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्याप्रकरणी (Santosh Parab attack case) भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला आहे. विशेष म्हणजे याआधी सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने (Sindhudurg Session Court) आणि मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टात उद्या (27 जानेवारी) सुनावणी होणार आहे. दरम्यान, नितेश राणे सध्या सिंधुदुर्ग पोलिसांना (Sindhudurg Police) तपासात सहकार्य करताना दिसत आहेत. मध्यंतरी नितेश राणे हे अज्ञातवासात गेले होते. पण राज्य सरकारने कोर्टात (Maharashtra Government) सुनावणी संपेपर्यंत अटक करणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर ते माध्यमांसमोर आले होते. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून ते सिंधुदुर्ग येथील कणकवली पोलीस ठाण्याला (Kankavli Police Station) भेट देत आहेत. पोलिसांनी बजावलेल्या समन्सच्या पार्श्वभूमीवर ते रोज पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. सिंधुदुर्ग पोलिसांनी नितेश राणे यांना 24 ते 27 जानेवारीपर्यंत पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. या समन्सनुसार नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यात तीन दिवसांपासून हजेरी लावत आहेत. या दरम्यान नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळला गेला तर कदाचित नितेश राणे यांना अटक होऊ शकते. त्यामुळे नितेश राणे उद्या कणकवली पोलीस ठाण्यात समन्सनुसार दाखल होतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नितेश राणे यांची प्रतिक्रिया दरम्यान, नितेश राणे यांनी आज कणकवली पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "मला जी नोटीस दिली गेली होती त्याप्रमाणे मी 24 जानेवारीला हजर झालो होतो. तसेच 25, 26 जानेवारीलाही मी पोलीस ठाण्यात दाखल झालो होतो. याशिवाय मी उद्याही इथे हजर राहणार आहे. पोलीस तपासात मी पूर्णपणे सर्व सहकार्य करेन, असं मी पहिल्या दिवसापासून शब्द दिला होता. पोलिसांनी बोलवल्यानुसार मी दिलेल्या वेळत उपस्थित झालेलो आहे. यापुढेही पोलिसांना जिथे-जिथे माझे सहकार्य लागेल तिथे मी सहकार्य करेन. सुप्रीम कोर्टात माझा जामीनाचा अर्ज दाखल झालेला आहे. या अर्जावर उद्या सुनावणी आहे", असं नितेश राणे यांनी सांगितलं आहे. (वांद्र्यात मोठी दुर्घटना, चार मजली इमारत कोसळली, 15 जखमी) नेमकं प्रकरण काय? शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले होते. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत असावेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं राणेंचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या