Home /News /maharashtra /

"यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा.... याद रखना शिवसेना" नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

"यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा.... याद रखना शिवसेना" नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

Nitesh Rane on CM Konkan Tour: तौत्के चक्रीवादळग्रस्त भागाचा मुख्यमंत्र्यांनी दौरा केल्यावर नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

    मुंबई, 21 मे: तौत्के चक्रीवादळाने (cyclone tauktae) महाराष्ट्राच्या कोकण (Konkan) किनारपट्टीला मोठा फटका बसला. कोकणातील रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा केला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्या (CM Uddhav Thackeray Konkan tour)वरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वादळग्रस्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी सकाळी कोकणात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अगदी दुपारपर्यंत आटोपला आणि त्यावरुनच भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्ममंत्र्यांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं, "यालाच म्हणतात 'lipstick' दौरा... मुख्यमंत्री... कुठल्याही गावाला भेट नाही... मोजून 10 km आतच... विमानतळावरच आढावा... दौरा संपला!!! ईथे... फडणवीसजींचा 700kms चा झंझावात कोकण सब हिसाब करेगा... याद रखना शिवसेना!!". वाचा: Tauktae Cyclone: मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही, रत्नागिरी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही इतकेच नाही तर नितेश राणे यांनी आणखी एक ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यााचं कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यातील फोटोज पोस्ट करत नितेश राणे यांनी त्याला कॅप्शन दिलं आहे, "आमचा नेता लय पॉवरफुल्ल". मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही - मुख्यमंत्री चक्रीवादळामुळे नुकसानीचे पंचनामे एक दोन दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर राज्यस्तरावर आढावा घेवून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल. चक्रीवादळामुळे ज्या ज्या घटकांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत दिली जाईल. कोळी बांधव, मच्छिमार व्यावसायिक यांच्यासह कोणताही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Cyclone, Nitesh rane, Uddhav thackeray

    पुढील बातम्या