...म्हणून उद्धव ठाकरे राज्यपालांना सतत भेटतात, नितेश राणेंनी केला गंभीर आरोप

...म्हणून उद्धव ठाकरे राज्यपालांना सतत भेटतात, नितेश राणेंनी केला गंभीर आरोप

भाजपची जी भूमिका आहे तीच आमची आहे असंही नितेश राणे म्हणाले.

  • Share this:

दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग, 16 फेब्रुवारी : 'शिवसेनेची म्हणून भूमिका न मांडता उध्दव ठाकरे यानी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून रिफायनरीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी,' असं आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी दिलं आहे. नाणार रिफायनरीबाबत आम्ही आमची भूमिका दडवून ठेवण्याचा प्रश्न नसून जी भाजपची भूमिका आहे तीच आमची आहे असंही नितेश राणे म्हणाले.

आंगणेवाडी यात्रेनिमित्त सिंधुदुर्गच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यानी किमान विकास कामांवरील स्थगिती तरी उठवावी अशी आपली अपेक्षा असल्याचं सांगत नितेश राणे यांनी शिवसेना भाजपासोबत येण्यास उत्सुक असल्यानेच वारंवार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यपालांना भेटत असल्याचा आरोप केला आहे.

हिंमत असेल तर चला पुन्हा लोकांच्या कोर्टात, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना 'ओपन चॅलेंज'

'मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे सिंधुदुर्गात येत आहेत. पण शिवसैनिकानी त्यांच्या जेवणाचा खर्चही केला नाही. तो भार प्रशासनावर टाकला आहे. आम्हाला सांगितल असतं तर आम्ही पाठवली असती त्यांच्यासाठी मच्छी कमी काट्याची... हा दौऱा म्हणजे प्रशासनावर ताण आहे,'असंही नितेश राणे म्हणाले.

अजित पवारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर निशाणा

'उद्धव ठाकरे इकडे भरपूर पॅकेज जाहीर करतील पण तिकडे अजित पवार बसले आहेत. ते थोडीच यांना देणार,' असं म्हणत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2020 11:09 PM IST

ताज्या बातम्या