...आणि नितेश राणेंनी वडील नारायण राणेंची सभा पाहिली 'गच्ची'वरून !

...आणि नितेश राणेंनी वडील नारायण राणेंची सभा पाहिली 'गच्ची'वरून !

या सभेत नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे व्यासपीठावर वडिलांसोबत हजर होते. तर काँग्रेसचे आमदार नितेश राणे मात्र व्यासपीठावर पोहचू शकले नाही.

  • Share this:

08 डिसेंबर : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांची सभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी त्यांचे दोन्ही सुपूत्र निलेश राणे आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. पण, नितेश राणे हे प्रत्यक्ष सभेत नव्हते तर ते सभेशेजारील एका घराच्या गच्चीवरून सभा पाहत होते.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच नारायण राणे कोल्हापूर दाखल झाले. अंबाबाईचं दर्शन घेऊन राणेंनी संध्याकाळी दसरा चौकात जाहीर सभा घेतली. या सभेत नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे व्यासपीठावर वडिलांसोबत हजर होते. तर काँग्रेसचे आमदार नितेश राणे मात्र व्यासपीठावर पोहचू शकले नाही. त्यांना सभेत सहभागही घेता आला नाही. त्यांनी सभेच्या शेजारी एका घराच्या गच्चीवरून वडील नारायण राणेंची सभा पाहिली.

विशेष म्हणजे, गुरुवारीच विधान परिषदेच्या निवडणुकीत नितेश राणेंनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न केल्याचा संशय आहे. तसं खुद्ध नितेश राणे यांनीच जगजाहीर करून टाकलं होतं. त्यामुळे काँग्रेसने नितेश राणेंच्या या कृत्याची दखल घेतली होती. आज नितेश राणेंनी सावधानता बाळगत बाहेरूनच सभेचा आनंद घेतला.

First published: December 8, 2017, 8:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading