कलम 370 रद्द झालं आणि नितेश राणेंनी मोदी सरकारला विचारला थेट प्रश्न

कलम 370 रद्द झालं आणि नितेश राणेंनी मोदी सरकारला विचारला थेट प्रश्न

गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमाप्रश्नावरून खटके उडत आहेत.

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटेतील कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसंच आता जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश होणार असून लडाखला जम्मू काश्मीरपासून वेगळं करण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे. अशातच महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी या निर्णयानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जम्मू काश्मीरातील कलम 370 हटवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं नितेश राणे यांनी स्वागत केलं आहे. तसंच या निर्णयाबाबत त्यांनी सरकारचे आभारही मानले आहेत. पण त्याचवेळी नितेश राणे महाराष्ट्र-बेळगाव सीमाप्रश्नावर सरकारला प्रश्नही विचारला आहे. ‘काश्मीरमधील ऐतिहासिक निर्णयानंतर...गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली बेळगाव महाराष्ट्राला देण्याची मागणी का पूर्ण करत नाही?’ असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये सीमाप्रश्नावरून खटके उडत आहेत. बेळगावचं महाराष्ट्राला मिळावं, यासाठी अनेकदा आंदोलन झाली आहेत. मात्र केंद्र सरकारकडून ही मागणी अद्यापपर्यंत पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नितेश राणे यांनी केलेल्या मागणीनंतर सरकार याबाबत काही हालचाली करणार की पुन्हा दुर्लक्षच करणार, हे पाहावं लागेल.

दरम्यान, जम्मू काश्मीरसाठी लागू असलेलं कलम 370 रद्द करण्याचं ऐतिहासिक पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं उचललं. सरकारच्या या निर्णयाचे काश्मीर खोऱ्यात अनेक परिणाम होणार आहेत.

370 कलम काढून घेतल्यानंतर काय फरक पडणार?

- आता सरळ केंद्र सरकार जम्मू काश्मीरचे कामकाज पाहणार

- केंद्र सरकार स्वतः विकासाचे प्रकल्प राबविणार

- राज्याचा दर्जा काढल्यामुळे दिल्ली राज्यसारखी सारखी परिस्थिती निर्माण होणार

- जमीन खरेदी, व्यवसाय करण्याचा अधिकार मिळणार

- भ्रष्टचाराला आळा बसेल असा सरकारचा दावा

- वेगळा झेंडा लावण्याचा अधिकार काढून घेण्यात आला

- उपराज्यपालाच्या माध्यमातून केंद्र सरकार काम करणार

VIDEO: काश्मीरप्रश्नी अमित शहांचा आक्रमक अंदाज म्हणाले, आम्ही बलिदानही देऊ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 02:52 PM IST

ताज्या बातम्या