Home /News /maharashtra /

Nitesh Rane : नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनाच्या सुनावणीत राज्य सरकारची महत्त्वपूर्ण ग्वाही, कोर्टात नेमकं काय घडलं?

Nitesh Rane : नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनाच्या सुनावणीत राज्य सरकारची महत्त्वपूर्ण ग्वाही, कोर्टात नेमकं काय घडलं?

नितेश राणे यांचे वकील नितीन प्रधान यांनी हायकोर्टात शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणात FIR दाखल करण्यात उशिर झाल्याचा दावा केला.

  मुंबई, 12 जानेवारी : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) सुनावणी झाली. नितेश राणे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील नितीन प्रधान (Advocate Nitin Pradhan) यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचं नाव गोवण्यात आल्याचा पुन्हा दावा केला. तसेच त्यांनी घटना घडल्यापासून ते नंतरच्या अनेक घडामोडींचा कोर्टात उल्लेख केला. यावेळी दोन्ही बाजूंकडून झालेल्या युक्तीवादादरम्यान राज्य सरकारकडून नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होत नाही तोपर्यंत अटक करणार नाही, अशी पुन्हा एकदा ग्वाही देण्यात आली. दरम्यान, कोर्टाने युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही उद्या 13 डिसेंबरला (गुरुवार) होईल. त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्याच फैसला होणार असल्याची शक्यता आहे. नितेश राणेंचे वकील नेमकं काय म्हणाले? नितेश राणे यांचे वकील नितीन प्रधान यांनी हायकोर्टात संबंधित प्रकरणात FIR दाखल करण्यात उशिर झाल्याचा कोर्टात दावा केला. तसेच संबंधित प्रकरणाचा नितेश राणे यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाहून मांजरीचा आवाज काढलेल्याशी असल्याचादेखील त्यांनी अप्रत्यक्षपणे दावा केला. "विधानभवन परिसरात कॅट कॉलिंग प्रकार घडला. ते प्रकरण जिव्हारी लागलं म्हणून नितेश राणे यांना या प्रकरणात गोवण्यात आलं. त्या प्रकरणानंतर नितेश राणे यांना धडा शिकवणार, असं शिवसेना नेते म्हणाले होते. हल्लेखोराचे (कांबळे) केवळ विधान म्हणजे प्राणघातक हल्ल्यामध्ये नितेश राणे गुंतले असे होत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले. हल्ल्याची घटना ही 18 डिसेंबरला घडली. विधानभवन परिसरात 23 डिसेंबरला कॅट कॉलिंग प्रकरण घडलं. त्यानंतर 24 डिसेंबरला नितेश राणे यांना पोलीस ठण्यात बोलावण्यात आले. घटनेनंतर उशिरा FIR दाखल करण्यात आली", असं वकील नितीन प्रधान म्हणाले. हेही वाचा : बेदम मारहाण करत केलं आगीच्या हवाली, मुलांच्या डोळ्यादेखत बायकोची भयावह हत्या नितीन प्रधान यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर राज्य सरकारकून हायकोर्टात पुन्हा एकदा ग्वाही देण्यात आली. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना अटक होणार नाही, असं राज्य सरकारकडून हायकोर्टात सांगण्यात आलं आहे. दरम्यान, हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. आता या प्रकरणाची सुनावणी उद्या दुपारी एक वाजता होईल, असं हायकोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं. नेमकं प्रकरण काय? शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेस पात्र असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं राणेंचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राण हे नॉट रिचेबल आहेत. तसेच त्यांनी जामीन अर्जासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Chetan Patil
  First published:

  Tags: BJP, Nitesh rane

  पुढील बातम्या