Home /News /maharashtra /

केसरकरांच्या गौप्यस्फोटानंतर नितेश फडणवीसांच्या भेटीला, राणे पूत्राचा बोलण्यास नकार

केसरकरांच्या गौप्यस्फोटानंतर नितेश फडणवीसांच्या भेटीला, राणे पूत्राचा बोलण्यास नकार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राणे कुटुंबियांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे.

    मुंबई, 5 ऑगस्ट : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राणे कुटुंबियांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे, यावेळी नितेश राणे यांनी दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला. भाजप आणि शिवसेना हे मागच्या वर्षी पुन्हा एकदा एकत्र येणार होते, पण राणेंकडून केली गेलेली वक्तव्य याला अडसर ठरल्याचा दावा केसरकर यांनी केला होता. काय म्हणाले केसरकर? सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची बदनामी केली गेली, यात नारायण राणेंचाही सहभाग होता, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर ही वस्तूस्थिती घालून राणे काय बोलत आहेत ते सांगितलं, त्यांनीही प्रतिसाद दिला. त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात संवाद सुरू झाला आणि नंतर त्यांची भेट झाली, असं केसरकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार होते, पण नंतर 12 आमदारांचं निलंबन झालं, नंतर राणेंना केंद्रात घेतलं गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले, ही गोष्ट दोन-तीन लोकांना माहिती होती, त्यात रश्मी ठाकरेही होत्या, असा गौप्यस्फोट केसरकर यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा शिंदेंना बाजूला ठेवा, आपण एकत्र येऊ असं उद्धव ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं, पण भाजप यासाठी तयार झाली नाही, असा दावाही केसरकर यांनी केला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Nitesh rane, Shivsena

    पुढील बातम्या