सिंधुदुर्ग, 01 जून : सिंधुदुर्गात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनावर गंभीर आरोप केला आहे.
नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्यानंतर ड्युटीवर हजर करण्यात आले होते, असा आरोप राणेंनी केला.
या परिचारिकेचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. तरीही पॉझिटिव्ह असलेल्या या परिचारिकेला लहान मुलांच्या वॉर्डमध्ये काम करण्यास सांगितले होते, असा दावाही राणेंनी केला.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय मध्ये कालच एक स्टाफ नर्स आली पाॅझिटीव्ह... सदर नर्सने पंधरा दिवस कोरोना वाॅर्ड मध्ये काम केल्यानंतर तीची कोवीड तपासणी केली गेली. 3 दिवस कोवीड सूट्टी पूर्ण झाल्यावर तीचे कोविड रिपोर्ट येण्याअगोदर तीला लहान मूलांच्या वॉर्ड मध्ये काम करायला लावले!!!
— nitesh rane (@NiteshNRane) May 31, 2020
तसंच, 'मागील आठवड्यात शनिवारी या परिचारिकेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. तत्पूर्वी तिचा स्वॅब घेण्यात आला होता. स्वॅब घेतल्यानंतरही या परिचारिकेला क्वारंटाइन का करण्यात आले नाही', असा सवालही नितेश राणेंनी उपस्थितीत केला.
'जिल्हा रुग्णालयामध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सिंधुदुर्गात कोरोनाच्या कम्युनिटी स्प्रेडची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक लोकांचं आयुष्य धोक्यात आलं आहे', अशी भीती नितेश राणेंनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -देऊळ बंदच, विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाबाबत महत्त्वाची बातमी!
ही परिचारिका जिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डमध्ये काम करत होती. त्यामुळे या परिचारिकेची कोविड चाचणी करण्यात आली . परंतु, चाचणी घेतल्यानंतरही या परिचारिकेला कामावर रूजू होण्यास सांगितलं होतं, असंही राणेंनी सांगितलं.
या प्रकरणी जबाबदारी म्हणून सिंधुदुर्गाच्या सिव्हिल सर्जनवर कारवाई व्हावी अशी मागणीही नितेश राणे यांनी आरोग्य मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sindhudurg, Tweet