मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुख्यमंत्री सिंधुदुर्गातून परताच निलेश राणेंनी दिला धक्का, सेनेचे 3 सदस्य भाजपात!

मुख्यमंत्री सिंधुदुर्गातून परताच निलेश राणेंनी दिला धक्का, सेनेचे 3 सदस्य भाजपात!तर शिवसेनेचे संख्याबळ 10 वरून 7 वर गेले आहे. यानंतर तीन मोठे धक्के निलेश राणे शिवसेनेला देण्याच्या तयारीत आहेत.

तर शिवसेनेचे संख्याबळ 10 वरून 7 वर गेले आहे. यानंतर तीन मोठे धक्के निलेश राणे शिवसेनेला देण्याच्या तयारीत आहेत.

तर शिवसेनेचे संख्याबळ 10 वरून 7 वर गेले आहे. यानंतर तीन मोठे धक्के निलेश राणे शिवसेनेला देण्याच्या तयारीत आहेत.

  • Published by:  sachin Salve

सिंधुदुर्ग, 10 ऑक्टोबर : सिंधुदुर्गामध्ये (Sindhudurg  ) चिपी विमानतळाच्या (chipi airport sindhudurg) उद्घाटनाच्या श्रेय वादानंतर पुन्हा एकदा शिवसेना (shivsena) विरुद्ध राणे (narayan rane) असा सामना पहायला मिळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांचा सिंधुदुर्ग दौऱ्याला 24 तास होत नाहीत. तेच  माजी खासदार निलेश राणे (nilesh rane) यांनी शिवसेनेला झटका दिला आहे. कुडाळ पंचायत समितीचे शिवसेनेच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

माजी पंचयात समिती सभापती आणि  विद्यमान सदस्य राजन जाधव, सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निलेश राणे यांचे कट्टर समर्थक विशाल परब व दादा साईल यांचा या प्रवेशात मोठा हात आहे.

या झाडाला मिळतंय 24 तास संरक्षण, एक पानही गळलं तरी प्रशासनात उडते खळबळ

कुडाळ पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे 10 संख्याबळ तर भाजपचे संख्याबळ 8 आहे. एका वर्षापूर्वी कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तीन पंचायत समिती सदस्यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे भाजपचे संख्याबळ 8 वरून 11 वर आले आहे.

IPL : हे खेळाडू सपशेल फेल, एका विकेटची किंमत 1 कोटी, 5 कोटी मिळूनही अर्धशतक नाही

तर शिवसेनेचे संख्याबळ 10 वरून 7 वर गेले आहे. यानंतर तीन मोठे धक्के निलेश राणे शिवसेनेला देण्याच्या तयारीत आहेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघ बांधणीसाठी माजी खासदार निलेश राणे यांचे हे पहिले पाऊल असल्याचं संकेत मिळत आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या नावाची चर्चा आहे. त्याची मोर्चेबांधणीची ही सुरवात असल्याचं मानलं जातं आहे. तर पक्ष प्रवेश केलेल्या सदस्यांनी आपण इथल्या आमदारांवर नाराज असल्याने आपण शिवसेना सोडल्याचं सष्ट केलंय.

First published:

Tags: Shivsena, भाजप