मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व, नॉट रिचेबल असलेल्या नितेश राणेंनी Facebook पोस्ट करत म्हटलं 'गाडलाच'

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व, नॉट रिचेबल असलेल्या नितेश राणेंनी Facebook पोस्ट करत म्हटलं 'गाडलाच'

Nitesh Rane Facebook post after sindhudurg district bank election result: सिंधुदुर्ग जलि्हा बँकेवर भाजप पुरस्कृत सिद्धीविनायक पॅनलने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. या विजयानंतर नितेश राणे यांनी एक पोस्ट केली आहे.

Nitesh Rane Facebook post after sindhudurg district bank election result: सिंधुदुर्ग जलि्हा बँकेवर भाजप पुरस्कृत सिद्धीविनायक पॅनलने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. या विजयानंतर नितेश राणे यांनी एक पोस्ट केली आहे.

Nitesh Rane Facebook post after sindhudurg district bank election result: सिंधुदुर्ग जलि्हा बँकेवर भाजप पुरस्कृत सिद्धीविनायक पॅनलने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. या विजयानंतर नितेश राणे यांनी एक पोस्ट केली आहे.

सिंधुदुर्ग, 31 डिसेंबर : बहुचर्चेत अशा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल (Sindhudurg District Bank Election Result) समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपने (BJP) वर्चस्व मिळवल्याने महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) एक मोठा झटका बसला आहे. सर्वाधिक जागा जिंकत भाजप पुरस्कृत सिद्धीविनायक पॅनलने बँकेवर वर्चस्व मिळवलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासाठी ही वर्चस्वाची लढाई होती. नारायण राणेंनी गड जिंकताच नितेश राणे यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे. (Nitesh Rane Facebook Post after Sindhudurg District Central Co operative Bank Election Result)

नितेश राणेंची फेसबूक पोस्ट

गेल्या अनेक दिवसांपासून नितेश राणे हे नॉट रिचेबल आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल समोर येताच नितेश राणे यांनी एक फेसबूक पोस्ट केली आहे. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये नितेश राणे यांचा एक फोटो असून त्याखाली सतीश सावंत यांचा चेहरा आहे. ही पोस्ट शेअर करताना नितेश राणे यांनी त्यावर एक कॅप्शन दिलं आहे आणि ते म्हणजेच 'गाडलाच'.

वाचा : Sindhudurg District bank election result: सर्वाधिक जागा जिंकत बँकेवर भाजपचं वर्चस्व

सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समान मते

या निवडणूक निकालात शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली होती. मात्र, नंतर भाजपचे विठ्ठल देसाई यांनी विजय मिळवला. विठ्ठल देसाई यांच्या विजयामुळे भाजपच्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे तर महाविकास आघाडीला हा एक मोठा झटका आहे.

दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्यामुळे अखेर चिठ्ठी टाकून उमेदवार विजयी ठरवण्यात आला. चिठ्ठी टाकून भाजपचे विठ्ठल देसाई यांचा विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे. विद्यमान अध्यक्षांचा पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.

वाचा : जिल्हा बँक निवडणूक: सेना-BJP उमेदवारांना समान मते, चिठ्ठी टाकून कुणाचा विजय? वाचा

सिद्धीविनायक पॅनेल भाजपा विजयी

1. मनीष दळवी - वेंगुर्ला

2. दिलीप रावराणे - वैभववाडी

3. प्रकाश गोडस - देवगड

4. विठ्ठल देसाई - कणकवली

5. अतुल काळशेकर : पणन विभाग

6. महेश सारंग : दुग्ध विभाग

7. संदीप परब

8. समीर सावंत : वैयक्तिक मतदार संघ

9. गजानन गावडे : मजूर विभाग

10. प्रज्ञा ढवन : महिला विभाग

11. अस्मिता बांदेकर : महिल विभाग

(विठ्ठल देसाई आणि सतिश सावंत यांच्यात टाई झाली होती. अखेर विठ्ठल देसाई यांचा विजयी झाला)

महाविकास आघाडी

1. व्हिक्टर डॅाटस : मालवण

2.विद्याप्रसाद बांदेकर : कुडाळ

3.विद्याधर परब : सावंतवाडी

4.गणपत देसाई : दोडामार्ग

5. सुशांत नाईक : कणकवली

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा झटका

या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या (BJP wins maximum seats) आहेत. महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा झटका असून भाजपच्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. मात्र, असे असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एक झटका बसला आहे. कारण, जिल्हा बँक अध्यक्ष पदाचे दावेदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे निकटवर्तीय राजन तेली (Rajan Teli) यांचा पराभव झाला आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Nitesh rane, Shiv sena, Sindhudurg