मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सरकारी वकिलांचे कोर्टात पाच खमके दावे, नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनाच्या सुनावणीवेळी काय-काय घडलं?

सरकारी वकिलांचे कोर्टात पाच खमके दावे, नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनाच्या सुनावणीवेळी काय-काय घडलं?

 तुळजाभवानी देवीच्या मंदिरातच नितेश राणे यांनी राष्टवादीवर अश्लील भाषेत टीका केली आहे.

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातच नितेश राणे यांनी राष्टवादीवर अश्लील भाषेत टीका केली आहे.

सेशन कोर्टात गेल्या दोन दिवसांपासून नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती. अखेर कोर्टाने नितेश राणेंचा आज जामीन अर्ज फेटाळला आहे.

सिंधुदुर्ग, 30 डिसेंबर : सेशन कोर्टाने भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे भाजपला सर्वात मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे. कोर्टात गेल्या दोन दिवसांपासून नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती. अखेर कोर्टाने नितेश राणेंचा आज जामीन अर्ज फेटाळला आहे. याप्रकरणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि भूषण साळवी यांनी बाजू मांडली. तर नितेश राणे यांच्याबाजूने अॅड. संग्राम देसाई यांनी युक्तीवाद केला. या दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात काही महत्त्वपू्र्ण मुद्दे मांडले. त्यांनी कोर्टात नितेश राणे यांच्या विरोधात चार महत्त्वाचे मुद्दे आणि पुरावे मांडले. त्यामुळे अखेर सेशन कोर्टाकडून नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

सरकारी वकिलांचे कोर्टातील चार महत्त्वाचे मुद्दे

1) जिल्हा बँकेचे उमेदवार सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर सिल्व्हर रंगाच्या इनोव्हा गाडीने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्या गाडीतील चार आरोपींनी थेट नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचं नाव घेतलं होतं. हा या प्रकरणातला पहिला पुरावा आहे, असा युक्तीवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात केला.

2) संतोष परब यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव सचिन सातपुते आहे. या सचिन सातपुते आणि नितेश राणे यांचे कसे संबंध आहेत ते कोर्टासमोर सरकारी वकिलांना मांडले.

3) नितेश राणे यांचा पीए राकेश परबच्या फोनवरुन 33 वेळा फोन करण्यात आला, असा तांत्रिक मुद्दा कोर्टात मांडण्यात आला.

4) जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवार मनीष दळवी हे देखील या हल्ल्याप्रकरणात सहभागी असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर त्यांंचा देखील अंतरिम जामीन कोर्टात फेटाळण्यात आला.

5) संतोष परब यांच्यावर उजव्या छातीच्या बाजूला हल्ला झाला होता. त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आला होता. त्या वारमध्ये 17 सेमीपर्यंतची जखम झाली होती. याबाबतचे मेडिकल रिपोर्ट सरकारी वकिलांनी कोर्टात सादर केले. अशा विविध मुद्दे सरकारी वकिलांनी मांडल्यामुळे नितेश राणे यांचा जामीन अखेर फेटाळला गेला.

हेही वाचा : भाजपला सर्वात मोठा झटका, नितेश राणेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक होणार?

नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांचा कोर्टातील युक्तीवाद

नितेश राणे यांची बाजू मांडणारे वकील संग्राम देसाई यांनी सरकारी वकिलांनी केलेले सर्व आरोप फेटाळले होते. विशेष म्हणजे बुधवारी (30 डिसेंबर) झालेल्या सुनावणीत त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले होते.

संग्राम देसाईंच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे

1) नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा या प्रकरणात कोणताही संबंध येत नाही. हा बनाव करण्यात आला आहे. जिल्हा बँक निवडणूक संदर्भात जाणीवपूर्वक नितेश राणे यांच नाव गोवण्यात आलेल आहे.

2) आमदार नितेश राणे दोन वेळ पोलीस चौकशीसाठी पोलिस स्थानकात हजर होतें मात्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जात असताना जो आवाज काढला त्याचा राग ठेऊन त्याला नितेश राणे यांना अटक करावी यासाठी पोलिसांवर दबाव वाढला.

3) संतोष परब आणि नितेश राणे यांचा पूर्ववैमन्यस्य कोणतही नव्हतं.

4) फिर्याद देण्यापूर्वी मीडियासमेर सतीश सावंत यांनी नितेश राणे यांचा हात आहे असं सांगितलं.

हेही वाचा : कणकवलीत राडा, शिवसेना-राणे समर्थक आमनेसामने

'आम्ही हायकोर्टात जाऊ किंवा सरेंडरचादेखील पर्याय आहे'

दरम्यान, कोर्टाची सुनावणी संपल्यानंतर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "हायकोर्टात जाण्याचा नक्कीच एक पर्याय आहे. आम्ही चर्चा करुन निर्णय घेऊ. शक्यतो आम्ही हायकोर्टातच जाऊ. मोबाईल फोन जप्त करायचे आहेत. त्यासाठी कस्टडीची गरज असल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं आहे. या व्यतिरिक्त कोणतंही कारण सांगितलेलं नाही. हायकोर्टात याप्रकरणी उद्या अर्ज दाखल करु. मध्ये शनिवार-रविवार सुट्टी असल्याने निश्चितच सोमवारी किंवा मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी होईल. अटकपूर्व जामीनासाठी आम्ही कोर्टात अर्ज केला आहे. त्यामुळे आम्हाला अटकेपासून दूर राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे. हायकोर्टात जायचं नसेल तर आमच्याकडे सरेंडर होण्याचा पर्याय आहे. याशिवाय नितेश राणे यांनी पोलिसांना तपासात पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. यापुढेदेखील आम्ही मदत करु", असं वकील संग्राम देसाई यांनी सांगितलं.

First published:
top videos