नितेश राणेंची दादागिरी; अभियंत्याला शिवीगाळ, अंगावर ओतलं चिखलाचं पाणी!

Mumbai - Goa Highwayच्या कामाची दखल घेत नितेश राणे यांनी कणकवलीत आंदोलन केलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 01:48 PM IST

नितेश राणेंची दादागिरी; अभियंत्याला शिवीगाळ, अंगावर ओतलं चिखलाचं पाणी!

कणकवली, दिनेश केळुसकर, 04 जुलै : कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी चौपदरीकरणाचं काम सुरू असलेल्या मुंबई – गोवा हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना देखील घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. मुंबई – गोवा हायवे चौपदरीकरणाच्या कामाची दखल कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी घेतली असून त्यांनी थेट आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांना यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. त्यानंतर अभियंते प्रकाश शेडेकर यांना  खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न देखील केला. मागील काही दिवसांमध्ये कोकणातील मुसळधार पावसामुळे मुंबई – गोवा हायवेवरील प्रवास धोक्याचा झाला आहे. रस्ते खचल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. याची दखल घेत नितेश राणे यांनी हायवे अभियंत्याला जाब देखील विचारला.

लग्नाच्या Reception पूर्वी व्हायरल झाले नुसरत जहाँचे हे फोटो

नितेश राणे आक्रमक

हायवेच्या कामावर नितेश राणे आक्रमक झालेले दिसून आले. यावेळी त्यांनी सर्विस रोड का नाही बांधला? गोव्यामध्ये सर्विस रोड होतो मग कणकवलीत का नाही? असा सवाल अभियंता प्रकाश शेडेकर यांना विचारला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतून त्यांना खांबाला बांधण्याचा प्रयत्न देखील केला. यावेळी नितेश राणे 15 दिवसात समस्या सोडव अशी तंबी देखील अभियंता प्रकाश शेडेकर यांना दिली.

काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का; या बडया नेत्याचा राजीनामा

Loading...

कोकणात मुसळधार

कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाल्यांना देखील पूर आला आहे. शिवाय, शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे चिपळूण येथील तिवरे धरण फुटल्याची दुर्दैवी घटना देखील घडली आहे.

SPECIAL REPORT: रोहित पवार मैदान मारणार की त्यांचाही 'पार्थ' होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 01:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...