मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भुखंडावरून शिंदेंना अडचणीत कोण आणतंय? फडणवीसांचं नाव घेत राऊतांनी सांगितली Inside Story

भुखंडावरून शिंदेंना अडचणीत कोण आणतंय? फडणवीसांचं नाव घेत राऊतांनी सांगितली Inside Story

एनआयटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण यावरून आता संजय राऊतांनी यामागे भाजप असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

एनआयटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण यावरून आता संजय राऊतांनी यामागे भाजप असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

एनआयटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण यावरून आता संजय राऊतांनी यामागे भाजप असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 22 डिसेंबर : दिशा सालियान मृत्यूप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरेंवर आरोप केले. यानंतर याचे पडसाद विधानसभेतही उमटले. दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आक्रमक झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार असल्याचं सांगितलं.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे. ठाकरेंच्या पक्षाला बदनाम करण्यासाठी दिशा सालियानच प्रकरण पुन्हा उकरून काढण्यात आलं, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधातील भूखंड घोटाळ्याचा आरोपाप्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी दिशाचं प्रकरण पुढे आणण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. भूखंड प्रकरणी बावनकुळेंसह भाजपच्या तीन आमदारांनी प्रश्न विचारले होते,याची आठवणही संजय राऊतांनी करून दिली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या इशाऱ्यावर नाचतात.आमच्या फाईल्स ओपन करता मग तुमच्या फाईलची चौकशी कोण करणार? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. तुमच्या घरातल्या फाईल उघडायला लावू नका असा इशाराही राऊतांनी दिलाय.

राऊतांनी घेतलं फडणवीसांचं नाव

'एकनाथ शिंदेंच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड व्हावं ही भाजपमधल्याच देवेंद्र फडणवीस यांना मानणाऱ्या आमदारांची इच्छा आहे. हे प्रकरण बाहेर काढण्यात भाजपमधल्या प्रमुख लोकांचा हात आहे, हे मी दाव्याने सांगतो. भाजपचे लोक तोंडदेखलेपणाने तुमची बाजू घेत असतील, पण दिल्लीत आणि महाराष्ट्रात पडद्यामागे काय सुरू आहे, हे आम्हाला माहिती आहे,' असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री शिंदेंवर भुखंडाचे श्रीखंड लाटण्याचा आरोप, विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी

First published:
top videos

    Tags: BJP, Eknath Shinde, Sanjay raut