मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भलामोठा जहाज इला, चक्रीवादळाचा तडाखा काय असतो हे सांगणार हा VIDEO

भलामोठा जहाज इला, चक्रीवादळाचा तडाखा काय असतो हे सांगणार हा VIDEO

हे वादळ जसं जसं पुढे जात आहे. तसा तसा रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनारपट्टीला याचा तडाखा बसत आहे.

हे वादळ जसं जसं पुढे जात आहे. तसा तसा रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनारपट्टीला याचा तडाखा बसत आहे.

हे वादळ जसं जसं पुढे जात आहे. तसा तसा रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनारपट्टीला याचा तडाखा बसत आहे.

रत्नागिरी, 03 जून : निसर्ग चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या दिशेनं कूच केली आहे. 120 किमी प्रतितास वेगाने येणारे हे वादळ समुद्रात धुमशान घालत पुढे सरकत आहे. रत्नागिरीत एक भलेमोठे मालवाहतूक करणारे जहाज भरकटले आणि समुद्रकिनाऱ्याला लागले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील  मिऱ्या बंधाऱ्याजवळ समु्द्रात भरकटलेले जहाज येऊन आदळले आहे.  वादळ्याच्या तडाख्याने हे जहाज पार समु्द्र किनाऱ्याला येऊन पोहोचले आहे. भलेमोठे जहाज किनाऱ्यावर आदळल्यामुळे मिऱ्या बंधाऱ्याजवळील गावकऱ्यांनी एकच गर्दी केली.

या जहाजातील सर्व कर्मचाऱ्यांना स्थानिकांच्या मदतीने सुखरुपपणे जहाजातून खाली उतरवण्यात आले आहे.हे मालवाहू जहाज सिमेंट घेऊन जात होते. पण, निसर्ग चक्रीवादळामुळे समुद्रात याचा निभावा लागला नाही.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाने आता रायगडकडे कूच करण्यास सुरुवात केल्यामुळे सिंधुदुर्गात आता वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. पण हे वादळ जसं जसं पुढे जात आहे. तसा तसा रत्नागिरी जिल्ह्यातल्या किनारपट्टीला याचा तडाखा बसत आहे.  रत्नागिरीतल्या दापोली गुहागर हर्णे भागात या ताशी एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे आणि पाउसही सुरू आहे.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ गुजरात आणि महाराष्ट्राकडे सरकत आहे. बुधवारी दुपारपर्यंत हे चक्रीवादळ मुंबईत धडकेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला आहे. 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळाचा धोका निर्णय झाला आहे. याआधी दोन वेळा 1948 आणि 1980 रोजी मुंबईला चक्रीवादळाचा धोका होता. 1980 रोजी आलेलं चक्रीवादळ समुद्रातच शांत झाल्यानं मुंबईत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नाही मात्र 1948 रोजी आलेल्या वादळानं मुंबईला मोठा तडाखा बसला होता.

First published:
top videos

    Tags: Rain, Ratnagiri