निसर्ग चक्रीवादळाचे संकट वेशीवर, पालघरमधून आली चिंताजनक बातमी

निसर्ग चक्रीवादळाचे संकट वेशीवर, पालघरमधून आली चिंताजनक बातमी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील समुद्र काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • Share this:

पालघर, 02 जून : महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. पण अशा परिस्थितीत निसर्ग चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे आहे. पालघरमधील समुद्रातून अजूनही 78 बोटी परत न आल्याची माहिती समोर आली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पालघर जिल्ह्यातील समुद्र काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर जिल्ह्यातील समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या 577 बोटींपैकी 499 बोटी परतल्या असून समुद्र किनारी लागल्या आहेत.  तर 78 बोटी अजूनही परतलेल्या नाहीत. त्यामुळे ह्या बोटी माघारी आणण्यासाठी कोस्टगार्ड ची मदत घेतली जात आहे.

हेही वाचा-गावचे सरपंच आहे भारी, कोरोना आला नाही दारी, महाराष्ट्रातील एकमेव असे गाव!

तर पालघर जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या असून समुद्र काठावरील व आजूबाजूच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबद्दल प्रशासनही जनजागृती करत असून स्थानिक  प्रशासन या येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज झालं आहे.  तर आज पालघर जिल्ह्यात पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी रिमझिम सुरू आहे.

मुंबईत रेड अलर्ट जारी

दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र मंगळवारी सकाळपर्यंत तीव्र डिप्रेशनमध्ये बदलेल. यामुळे मुंबईत मंगळवारी रात्री ते बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळाचं गांभीर्य लक्षात घेता हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. रविवारी हवामान खात्याने याबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला होता, परंतु सोमवारी तो बदलून रेड करण्यात आला आहे.

अतिवृष्टीचा इशारा

'स्कायमेट' या खासगी हवामान खात्याचे प्रमुख महेश पलावत म्हणाले की, "वादळ अद्याप तयार झालेलं नाही आणि अरबी समुद्राच्या मुंबई किनाऱ्यापासून सुमारे 600 किमी अंतरावर आहे." हे तीव्र नैराश्य भयानक वादळाचे रूप धारण करू शकते आणि नंतर उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधून वेगाने पुढे जाईल. या काळात मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड इथे 100 ते 200 मिलीमीटर पाऊस पडेल. वादळाचा सर्वाधिक परिणाम पालघरमध्ये दिसून येतो. 4 जूनच्या सकाळपर्यंत, त्याचा परिणाम सौम्य होईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 2, 2020, 10:26 AM IST
Tags:

ताज्या बातम्या