LIVE NOW

LIVE : राज्यात गणेश विसर्जनादरम्यान 8 जण बुडाले

आज प्रत्येक शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत.

Lokmat.news18.com | September 5, 2017, 9:03 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 5, 2017
auto-refresh

Highlights

Load More
05 सप्टेंबर: आज अनंत चतुर्दशी, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. गेले 10 दिवस बाप्पांचा सोहळा सुरू होता. त्यांचं कोडकौतुक केल्यानंतर, त्यांच्यासमोर मनोभावे प्रार्थना केल्यानंतर आज त्यांना निरोप दिला जाणार आहे. आज प्रत्येक शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आर्थिक राजधानी मुंबईत विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत. मोठमोठ्या मंडळाच्या विसर्जन मिरवणूकांसाठी त्या मंडळांना जय्यत तयारी आणि नियोजन केलं आहे. सर्व गणेशभक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाची आज राजेशाही विसर्जन मिरवणुक निघाली आहे. सकाळी ९:३० च्या सुमारास राजाची उत्तरआरती झाली. त्यानंतर १०:३० च्या सुमारास लालबागच्या राजाची शाही विसर्जन मिरवणुक लालबाग मार्केटमधुन निघाली. त्यानंतर राजाची मिरवणुक लालबाग ते भारतमाता सिनेमा परीसरातून जाणार आहे. आज सकाळी निघणारी राजाची विसर्जन मिरवणुक उद्या पहाटे गिरगाव चौपाटीवर पोहोचेल. त्यानंतर लालबागच्या राजाचं अरबी समुद्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सह्यायाने कोळी बांधव विसर्जन करणार आहेत. यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी समुद्रात स्कूबा डायवर्सही तैनात असणार आहेत.
corona virus btn
corona virus btn
Loading