निलेश राणेंकडून टीकेची पातळी घसरली, शिवसेना खासदाराचा फोटो शेअर करत लिहिलं...

निलेश राणेंकडून टीकेची पातळी घसरली, शिवसेना खासदाराचा फोटो शेअर करत लिहिलं...

खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 9 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. मात्र यावेळी निलेश राणे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळत आहे. कारण निलेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा फोटो शेअर करत त्यावर 'डुक्कर' असा उल्लेख केला आहे.

कोकणात राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून धुपसत आहे. त्यातूनच मग दोघेही एकमेकांवर आक्रमक टीका करताना पाहायला मिळतात. मात्र आता या टीकेची पातळी घसरताना दिसत आहे. एकमेकांवर आरे-तुरे करून टीका करणं इथंपासून ते आता प्राण्यांची उपमा देणं इथंपर्यंत हे राजकारण पोहोचलं आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर टीका करताना त्यांचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्यावर कॅप्शन लिहिलं आहे की, 'आज दुपारी कुडाळच्या जंगलात काही लोकांनी डुक्कर पकडला.' निलेश राणे यांच्या या ट्वीटवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. 'आपले वडील सुसंस्कृत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते याची तरी जाणीव ठेवा,' असा सल्ला एका ट्वीटर युझरने निलेश राणे निलेश राणेंना दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या जोरावर स्थापन झालेलं भाजपचं सरकार कोसळल्यावर विनायक राऊत यांनीही नारायण यांच्यावर विखारी टीका केली होती. 'विनायक राऊत यांनी ट्वीट करून राणे यांच्यावर टीका केली होती. राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले होते की, 'अखेर नारायण राणे यांच्या पनवतीने देवेंद्र फडणवीस बुडाले, आता नारायण राणे यांनी गणिताचा अभ्यास करत बसावे..'

कोकणातील राजकारण आणि राणे कुटुंब

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण अलिकडच्या काही वर्षात कोकणाच्या राजकारणावरची राणेंची पकड सैल झाल्याची पाहायला मिळत आहे. कारण स्वत: नारायण राणे यांचा मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तसंच त्यांचे सुपुत्र निलेश राणे यांना 2009 आणि 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत पराभव पचवावा लागला.

मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच 2009 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.

First published: December 9, 2019, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading