मुंबई, 3 फेब्रुवारी : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. भाजपच्या नादाला लागून राणे हास्यस्पद आरोप करत आहेत. आता त्यांना कोर्टात उत्तर द्यावं लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांनी पाठवलेल्या नोटीसीनंतर भाजप नेते निलेश राणे आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहेत. त्यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'संजय राऊत यांनी राणेसाहेबांवर बदनामीचा दावा दाखल केला आहे. मुळात बदनामीचा दावा दाखल करायला मार्केटमध्ये कसलीतरी इज्जत असावी लागते' असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
निलेश राणे यांनी नेमकं काय म्हटलं?
निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी नारायण राणे यांना पाठवलेल्या नोटीसीनंतर निलेश राणे आक्रमक झाले आहेत. 'संजय राऊत यांनी राणेसाहेबांवर बदनामीचा दावा दाखल केला आहे. मुळात बदनामीचा दावा दाखल करायला मार्केटमध्ये कसलीतरी इज्जत असवी लागते' असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
संज्याने राणेसाहेबांवर बदनामीचा दावा दाखल केलाय, मुळात बदनामीचा दावा दाखल करायला मार्केटमध्ये कसलीतरी इज्जत असावी लागते.
ज्याचं नाम नाही तो बदनाम होऊ शकत नाही. — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 3, 2023
संजय राऊतांचा राणेंना टोला
संजय राऊत यांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नारायण राणे यांना जोरदार टोला लगावला आहे. राणे भाजपच्या नादी लागून खोट बोलत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच नारायण राणे यांना पहिलं पद बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं होतं याचं भान त्यांनी ठेवावं असंही संजय राऊत यांनी म्हटल आहे. राऊत यांच्या या टीकेला आता निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Narayan rane, Nilesh rane, Sanjay raut, Shiv sena