नितेश राणे तरुंगात असताना निलेश राणेही झाले आक्रमक, शिवसेना मंत्र्याला म्हणाले...

माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेना मंत्र्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 11:44 AM IST

नितेश राणे तरुंगात असताना निलेश राणेही झाले आक्रमक, शिवसेना मंत्र्याला म्हणाले...

सिंधुदुर्ग, 6 जुलै : अभियंत्याला शिवीगाळ आणि चिखलफेक केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आता नितेश यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेना मंत्र्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

'रस्त्यांच्या खराब स्थितीविरोधात आंदोलन केल्यानंतर नितेश राणेंवर कारवाई करण्यात आली. मात्र ज्यांच्या कारभारामुळे तिवरे धरण फुटून 23 लोकांचा जीव गेला त्या शिवसेना आमदारांवर कारवाई का होत नाही. आणि शिवसेनेचे मंत्री म्हणतात खेकड्यांमुळे धरण फुटलं. अस कारण सांगणाऱ्या मंत्र्याला चपलांचा हार घालावा वाटतो,' असं म्हणत निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

नितेश राणेंचा राडा

मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांविरोधात कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी (4 जुलै)रोजी आक्रमक आंदोलन केलं. तसंच नितेश यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून अभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. इतकंच नाही तर शेडेकर यांना शिवीगाळ करत खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नदेखील केला. या प्रकारामुळे नितेश राणेंवर चौफेर टीका केली जात आहे. नितेश यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील घडल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. याबाबत नारायण राणे यांनी स्वतः माफीदेखील मागितली. तसंच 'नितेशनं केलेलं कृत्य चुकीचं होतं. मी त्याचं समर्थन करत नाही',असंही राणे यांनी म्हटलं.

नितेश राणेंवर कारवाईची मागणी

Loading...

अधिकाऱ्यांना चिखलाने आंघोळ घालणाऱ्या आमदार नितेश राणे यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित संघटनेने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून संघटनेनं ही मागणी केली आहे. नितेश राणे यांना जामीन मिळू नये यासाठी सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे.

जामीन फेटाळला

मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपअभियंत्याच्या अंगावर केलेली चिखलफेक राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या चांगलीच अंगाशी आली आहे. कणकवली कोर्टाने नितेश राणे यांचा जामीन फेटाळला आहे. नितेश राणेंसह इतर आरोपींना कोर्टाने 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकला. तसेच शेडेकर यांना आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना काल अटक करण्यात आली होती. नितेश राणे आणि त्यांच्या जवळपास 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(अ), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितेश राणेंसह सर्व आरोपींना काल दुपारी 3 वाजता कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने नितेश राणे यांच्यासह सर्व आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रानडुकराचा दिव्यांग तरुणावर हल्ला; जीव वाचवतानाची धडपड कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 11:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...