विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निलम गोऱ्हेंचं नाव निश्चित

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी निलम गोऱ्हेंचं नाव निश्चित

विदर्भातले नेते विजय वड्डेट्टीवार यांचं नाव काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित केलं आहे. वड्डेट्टीवार हे आक्रमक असून विदर्भातलेच असल्याने देवेंद्र फडणवीसांना आक्रमकपणे अंगावर घेतील अशी काँग्रेसची रणनीती आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, मुंबई 23 जून :विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक सोमवारी (24 जून) बिनविरोध होण्याची शक्यता आहे. संख्याबळानुसार युतीचं संख्याबळ वरचढ होत असल्याने आघाडीकडून उमेदवार उभा करण्याची शक्यता शक्यता कमी आहे. सोमवारीच परिषदेचे उपसभापती आणि विरोधपक्षनेतेपदाची निवड होणार आहे. दुपारी ही निवड होईल आणि नावं जाहीर होणार आहेत.

विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीच्या बदल्यात परिषदेच्या उपसभापतीपदाची निवड बिनविरोध करण्याची अट सत्ताधारी पक्षाकडून घालण्यात आली होती. अशा प्रकारचं सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांनाही दिले होते. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा होऊन परिषदेत उपसभापतीपदासाठी उमेदवार उभा करायचा नाही असं ठरलं आणि विरोधी पक्षनेतेपदाचाही मार्ग मोकळा झाला.

विदर्भातले नेते विजय वड्डेट्टीवार यांचं नाव काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित केलं आहे. वड्डेट्टीवार हे आक्रमक असून विदर्भातलेच असल्याने देवेंद्र फडणवीसांना आक्रमकपणे अंगावर घेतील अशी काँग्रेसची व्ह्युरचना आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये गेल्याने विरोधी पक्षनेतेपदी कुणाची निवड करायची असा प्रश्न काँग्रेससमोर होता. त्यानंतर दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून वडेट्टीवारांचं नाव निश्चित करण्यात आलं.

सध्याची संख्याबळ नुसार आघाडी 37, तर युती 40 आमदार आहेत. दोन अपक्ष शिक्षक आमदार असून यात दत्त्रात्य सावंत आणि श्रीकांत देशपांडे हे आहेत. हे दोन्ही आमदार जर निवडणूक लागलीच तर युतीसोबत राहतील याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

'पृथ्विराज चव्हाणांनी माझी काळजी करू नये'

गृहनिर्माण मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचं त्यांच्या लोणी या मुळगावी समर्थकांकडुन जंगी स्वागत करण्यात आलं. विखे पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांच दर्शन घेतलं. कॅबिनेटमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच लोणीत आले होते त्यामुळे समर्थकांमध्ये उत्साह होता. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देत काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनावरही टीका केली.

विखे पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी सोडावी, ज्यांच्यामुळे काँग्रेस पक्षाची अधोगती झाली त्याची काळजी करावी. ते मुख्यमंत्री असताना राज्यात 82 वरून 42 जागा काँग्रेसच्या आल्या. माझ्या विरोधात याचिका न्यायालयात असल्याने खटल्यांवर भाष्य करणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, माझ्यावर भाजपने विश्वास व्यक्त करत कॅबिनेट मंत्रिपद दिलं. पंतप्रधान, पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांनी जो विश्वास दाखवला त्यास पात्र राहाण्याचा प्रयत्न राहील.आम्ही विरोधात असताना माहितीच्या आधारे काम करण्यास सांगत होतो त्यापेक्षा चांगलं काम सरकार करतंय. दुष्काळाची दाहकता बघता  सरकारकडून जी अपेक्षा आहे त्यापेक्षा जास्त मदत सरकार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

First published: June 23, 2019, 10:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading