आणखी तीन महिने कांदा सगळ्यांनाच रडविणार, हे आहे कारण!

आणखी तीन महिने कांदा सगळ्यांनाच रडविणार, हे आहे कारण!

देशभरातल्या कांदा उत्पादक भागात सलग महिनाभर झालेल्या अतिवृष्टीनं खरीप कांद्याचं मोठं नुकसान झालंय. रब्बी कांद्याचा साठा संपत आलाय त्यामुळे अडचणी वाढणार आहेत.

  • Share this:

संदीप भुजबळ, मुंबई 04 डिसेंबर : दररोजच्या जेवणात अत्यावश्यक असणाऱ्या कांद्यांचे भाव सध्या आकाशाला भिडले आहेत. काद्यांने शंभरी पार केल्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. त्यामुळे जेवणातून कांदाच बाहेर गेलाय. या कांद्याच्या दरात आणखी 3 महिने कोणतीही घट होण्याची सूतराम शक्यता नाही, देशभरातल्या कांदा उत्पादक भागात सलग महिनाभर झालेल्या अतिवृष्टीनं खरीप कांद्याचं मोठं नुकसान झालंय. रब्बी कांद्याचा साठा संपत आलाय, नवा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात यायला आणखी 3 महिने वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतरच कांद्याच्या दरात दिलासा मिळेल अशी शक्यता आहे. कांद्यावरील स्टॉक लिमीट किंवा कांदा आयात करुन देशातली गरज पूर्ण होणार नाही अशी माहिती कांदा बाजाराचे विश्लेषक दिपक चव्हाण यांनी दिलीय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीनंतर घेणार सर्वात मोठा निर्णय

कांद्याची ही दरवाढ दलाल आणि नफेखोरांनी केली आहे. मनमाडमधल्या विक्रेत्यांना जो कांदा स्वस्तात मिळतो तो कांदा जास्त दरानं मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये विकला जात आहे. बाजार समित्यांमध्ये येणारा कांदा हा मध्यम आणि हलक्या प्रतीचा आहे. त्यामुळे कांद्याला सरासरी 7 हजार ते कमीत कमी 2 हजार रुपये भाव मिळत आहे.  हाच कांदा छोट्या शहरातून मोठ्या शहरात पाठवला जात आहे. मोठ्या शहरात जाताना कांद्याची होणारी मोठी दरवाढ कशी होते, याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

तिहारमधून सुटल्यानंतर चिदंबरम थेट सोनिया गांधींच्या भेटीला

कांदा साठवणुकीला लगाम

दरम्यान, कांद्याच्या दिवसेंदिवस वाढत्या दराला लगाम लावण्यासाठी केंद्र शासनाने आणखी एक पाऊल उचललंय. होलसेल व्यापाऱ्याला कांदा साठवणुकीची पन्नास मेट्रिक टनाची असलेली मर्यादा 25 मेट्रिक टन केली  आहे. तर किरकोळ व्यापाऱ्यांची दहा मेट्रिक टन  मर्यादा पाच मेट्रिक टन करण्यात आली आहे. या अगोदर केंद्र शासनाने कांद्यावर निर्यात बंदी, कांदा आयात, कांदा साठवणुकीवर मर्यादा आणि व्यापाऱ्यांवर छापे यांसारखी पाऊलं उचलल्यानंतरही कांद्याच्या भावात होत असलेली वाढ थांबलेली नाही.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 4, 2019, 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading