महाआघाडीची सभा
कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची आघाडी असलेल्या महाआघाडीची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये होणार आहे. एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नांदेडमध्ये हजेरी लावणार आहेत. त्याचेच औचित्य साधून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी आपले होम ग्राऊंड असलेल्या नांदेडमध्ये या सभेचं आयोजन केलं आहे. महाआघाडीची पहिलीच जाहीर सभा असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आज काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूत भाजपची युती
महाराष्ट्रानंतर आता तामिळनाडूतही एआयडीएमके यांच्यासोबत भाजपची युती होण्याची शक्यता आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा आज तामिळनाडू दौरा आहे. या युतीबद्दल घोषणा आज होऊ शकते.
परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता
पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कडक पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. आज परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज कोणती घोषणा करता हे पाहण्याचं ठरणार आहे.
बुलडाण्यात बहुजन वंचित आघाडीची सभा
भारिप नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असाउद्दीन ओवेसी यांचा राज्यभरात झंझावती दौरा सुरू आहे. आज बुलडाण्यात वंचित आघाडीची सभा पार पडणार आहे.