'न्यूज 18लोकमत'ने उघड केला घोटाळा, धनंजय मुंडेंकडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

'न्यूज 18लोकमत'ने उघड केला घोटाळा, धनंजय मुंडेंकडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेत दोषी अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड, 17 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील सामजिक न्याय विभागाच्या इमारतीच्या दुरुस्तीच्या कागदावर कामे दाखवून लाखोंचा निधी हडपल्याचा प्रकार 'न्यूज18 लोकमत'ने समोर आणला होता. या प्रकाराची आता सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेत दोषी अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात डागडुजीच्या नावाखाली लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार न्यूज 18लोकमत ने समोर आणला होता. त्यानंतर दस्तुरखुद्द सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेत ही कामे सन 2016- 2017 मधील आहेत. या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

सन 2016- 2017 मध्ये सामाजिक न्याय भवन परिसरातील मेन गेट, पेव्हर ब्लॉक,वाहन तळ , पार्किंग, या कामाची निर्मिती व डागडुजी करण्यासाठी टेंडर काढण्यात आले. मात्र किरकोळ दुरुस्ती करण्याची गरज नसताना ठेकेदाराने अधिकाऱ्याला हाताशी धरून लाखो रुपयांवर डल्ला मारला असल्याचा आरोप सामजिक कार्यकर्ते अजय सरवदे यांनी केला होता. तसंच धनंजय मुंडेंनी लक्ष घालून वंचितांना न्याय द्यावा अशी मागणी केली.

कागदोपत्री कामे पूर्ण झाले असल्याचे दाखवत तसा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला. प्रत्यक्षात मात्र याठिकाणी कुठलीच कामे झालेली नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी रोखण्यासाठी पत्रव्यवहार केला गेला. मात्र अधिकारी लक्ष देत नसल्याचा खुलासा समाजकल्याण उपायुक्त सचिन मडावी यांनी केला.

वेश्या व्यवसायातील महिलांचा NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट

सामाजिक न्याय मंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आढावा बैठकीत कामाचा सपाटा लावला. समाजकल्याण विभागात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम मंत्री महोदयांनी बैठकीत भरला होता. मात्र त्यांच्याच जिल्ह्यात एक नाही दोन नाही तर लाखो रुपयांचा घोटाळा उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

कोणत्या कामांसाठी काढले टेंडर?

1)इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील नाम फलकाची- किंमत 2 लाख 90हजार

2)इमारतीच्या आवारातील प्लेविंग ब्लॉकची दहा कामे, प्रत्येकी किमत -2लाख 90हजार

3)कोलपसीबल गेट - 2लाख 90हजार

4)नामफलक बसविणे-2लाख 90हजार

5)मोटार शेड बांधणे-2लाख 90हजार

6)कर्मचारी आणि जनतेसाठी पार्किंग शेड बांधणे- 2 लाख 90 हजार

7) टिनशेड बांधणे - 2 लाख 90 हजार

8)छताला गळती प्रतिबंधक - 2 लाख 90 हजार

9)इन्व्हर्टर बसविणे - 2 लाख 90 हजार

10)एलईडी फिटिंग - 2 लाख 90 हजार

11)विद्युत उदवाहक -2 लाख 90 हजार

First published: February 17, 2020, 4:37 PM IST

ताज्या बातम्या