महाराष्ट्रदिनानिमित्त न्यूज18 लोकमतचा खास ‘ऑडिओ शो’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत

महाराष्ट्रदिनानिमित्त न्यूज18 लोकमतचा खास ‘ऑडिओ शो’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत

‘1 मे महाराष्ट्र दिन’ साठीच्या उंबरठ्यावर असलेला आपला महाराष्ट्र उद्योग, कला,साहित्य, सामाजिक, माहीती-तंत्रज्ञान, कृषी अशा सर्वच क्षेत्रात देशात आघाडीवर आहे. महाराष्ट्रला आणखी मोठी झेप घ्यायची आहे. त्यासाठी काय करायला हवं, काय आहे रोडमॅप, कसा असेल महाराष्ट्र या विषयी सांगताहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, न्यूज18 लोकमतचे समुह संपादक डॉ.उदय निरगुडकर, पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे, अभिनेते मनोज जोशी, आयटी तज्ज्ञ विनायक पाचलाग,एम-इंडिकेटरचे सचिन टेके, प्रगतिशील शेतकरी विलास शिंदे आणि तरूण सामाजिक कार्यकर्ते यजुर्वेंद्र महाजन.

  • Share this:

मुंबई,ता.1 मे: विकासाची लोक चळवळ झाली तर महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र दिना’ निमित्त न्यूज18 लोकमतनं काढलेल्या विशेष डिजीटल ऑडिओ शो ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत बोलत होते.

‘साठीतला महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र’ या संकल्पनेवर हा अभिनव ऑडिओ शो असून मुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यात महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप सांगितला आहे. पर्सिस्टंट या आघाडीच्या आयटी कंपनीचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे, ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी, आयटी तज्ज्ञ विनायक पाचलाग, एम-इंडिकेटरचे सचिन टेके, प्रगतिशील शेतकरी विलास शिंदे आणि तरूण सामाजिक कार्यकर्ते यजुर्वेंद्र महाजन यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख मोजक्या शब्दात मांडला आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच डिजीटल शो असून तो तुम्ही www.news18lokmat.com या वेबसाईटवर, आमच्या फेसबुक पेजवर आणि ट्विटर हँडलवरही तुम्ही ऐकू शकता.

First published: May 1, 2018, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading