• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Update : उमेश कोल्हे हत्या प्रकरण, अटकेतील सर्व आरोपींना झटका, 15 जूलैपर्यंत NIA कोठडी

Live Update : उमेश कोल्हे हत्या प्रकरण, अटकेतील सर्व आरोपींना झटका, 15 जूलैपर्यंत NIA कोठडी

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | July 07, 2022, 21:04 IST
  LAST UPDATED A MONTH AGO

  हाइलाइट्स

  22:15 (IST)

  ठाणे पालिकेत शिवसेनेला मोठा धक्का
  शिवसेनेचे 66 माजी नगरसेवक शिंदे गटात
  नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेला खिंडार
  28 नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा
  मुख्यमंत्री शिंदेंचा नगरसेवकांनी केला सत्कार
  चौगुलेंच्या माध्यमातून 28 नगरसेवक शिंदे गटात
  आम्ही शिंदे साहेबांसोबत - विजय चौगुले
  काही नगरसेवक शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार

  21:42 (IST)

  दादरमधील पारसी जिमखान्यासमोर जलवाहिनी फुटल्यानं उद्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागातील काही भागात सकाळी पाणीपुरवठा होणार नाही - महापालिका प्रशासन

  21:34 (IST)

  विजय चौगुले मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी
  आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत - विजय चौगुले
  राजन विचारेंमुळे आम्ही नाराज आहोत - चौगुले
  शिवसेना सोडून एकनाथ शिंदेंना साथ - चौगुले

  21:2 (IST)

  - अमरावती उमेश कोल्हे हत्या प्रकरण

  - हत्याकांडातील सर्व आरोपींना 15 जुलै पर्यंत NIA (राष्ट्रीय तपास यंत्रणा) कोठडी

  - मुंबईच्या NIA कोर्टाचा निर्णय

  - अमरावतीवरून मुंबईमध्ये नेण्यात आले होते सर्व आरोपींना

  20:58 (IST)

  'पश्चिम वाहिनी नद्यांमधून वाहून जाणारं पाणी'
  सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवा - मुख्यमंत्री
  आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल - शिंदे
  नदीजोड प्रकल्पाबाबत आढावा बैठकीत सूचना

  20:58 (IST)

  'पश्चिम वाहिनी नद्यांमधून वाहून जाणारं पाणी'
  सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवा - मुख्यमंत्री
  आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल - शिंदे
  नदीजोड प्रकल्पाबाबत आढावा बैठकीत सूचना

  20:42 (IST)

  प्रवीण परदेशी पुन्हा 'अॅक्टिव्ह मोड'मध्ये?
  'सह्याद्री'वरील बैठकीत परदेशी झालेले सहभागी
  प्रवीण परदेशी फडणवीसांच्या जवळचे अधिकारी
  ठाकरे सरकारनं आयुक्तपदावरून हटवलं होतं
  परदेशी थेट केंद्रीय कमिट्यांमध्ये होते सक्रिय
  नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्रीय कमिटीतून निवृत्ती
  बैठकीत प्रवीण परदेशींच्या एन्ट्रीनं चर्चेला उधाण

  19:41 (IST)

  - भाजप नेते आशिष शेलार दिल्लीत दाखल

  - उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील दिल्लीत येणार

  19:0 (IST)

  मुंबईत रेड अलर्ट, ऑरेंज अलर्टचा इशारा
  'या दिवशी समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास बंदी'
  'सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी मुभा'
  त्यानंतर बिचेसवर कुणीही फिरकू नये - बीएमसी
  'यंदा समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्यूची नोंद'
  या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाचा निर्णय

  18:54 (IST)

  मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास बंदी

  कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स