शिवसेनेला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. त्यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे नेतेपदाच्या राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे.
अडचणीच्या काळात पक्ष आणि नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ईडीने केलेल्या कारवाईवेळी आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत व्यक्त केली.