शहिदाच्या पत्नीला अखेर जमीन मिळणार, 'न्यूज 18 लोकमत'च्या बातमीनंतर धनंजय मुंडेंचे निर्देश

शहिदाच्या पत्नीला अखेर जमीन मिळणार, 'न्यूज 18 लोकमत'च्या बातमीनंतर धनंजय मुंडेंचे निर्देश

शहीद जवानाच्या वीर पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांना अखेर न्याय मिळणार आहे.

  • Share this:

सुरेश जाधव, बीड, 9 फेब्रुवारी : हक्काच्या जमिनीसाठी सरकारी कार्यालयाला एक वर्षापासून चकरा मारणाऱ्या भाग्यश्री राख यांच्या फाईलची दखल घेतली जात नसल्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती. या बातमीची दखल घेत सामजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ जमीन उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश आहेत.

धनंजय मुंडे यांनी स्वतः फोन करून भाग्यश्री यांची विचारपूस करत शासन निर्णयाप्रमाणे 2 हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रशासकीय दफ्तर दिरंगाईने त्रास सहन करणाऱ्या शहीद जवानाच्या वीर पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांना अखेर न्याय मिळणार आहे.

पाटोदा तालुक्यातील थेरला येथील शहीद जवान तुकाराम राख हे 1 मे 2010 मधे ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झाले. त्यांच्यानंतर भाग्यश्री या एकट्याने संघर्ष करत कुटुंब चालवत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या 28 जून 2018च्या शासन निर्णयान्वये शहिदांच्या वारसांना शासनाकडून 2 हेक्टर जमीन देण्यात यावी, असा निर्णय आहे.

शेतात झोपला होता शेतकरी, अचानक झाले तलवारीने सपासप वार

'अधिकारी कुठलेही सहकार्य करत नाहीत, उडवाउडवीची उत्तरे देतात. माझी फाईल पूर्ण असताना देखील वर्षभरापासून सही होत नाही. मी एकटीने किती वेळा चकरा मारायच्या,' असा संताप भाग्यश्री यांनी व्यक्त केला होता. तसेच या बाबतीत सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना देखील निवेदन दिले होते. मात्र न्यूज 18लोकमत ने सर्वात अगोदर हा प्रश्न दाखवल्यानंतर धनंजय मुंडे यांनी दखल घेत याबाबत निर्देश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: beed
First Published: Feb 9, 2020 05:58 PM IST

ताज्या बातम्या