मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

News18 Lokmat Digital Impact : ST कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी महामंडळाकडून तत्काळ कारवाई

News18 Lokmat Digital Impact : ST कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी महामंडळाकडून तत्काळ कारवाई

या काळात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची भरपाई एसटी महामंडळ कुठून करणार असा सवाल संघटनांनी उपस्थित केला होता

या काळात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची भरपाई एसटी महामंडळ कुठून करणार असा सवाल संघटनांनी उपस्थित केला होता

या काळात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची भरपाई एसटी महामंडळ कुठून करणार असा सवाल संघटनांनी उपस्थित केला होता

पुणे, 27 मे : कोरोना काळात नागरिकांसाठी दिवस-रात्र झटणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाकडून तत्काळ कारवाई करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेकडून याबाबात पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांचं म्हणणं महामंडळाने ऐकलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे पेन्शन व विमा हप्त्याचे पैसे एस.टी. महामंडळाने त्या त्या संस्थेकडे वर्ग केले नसल्यामुळे कामगारांनी काढलेल्या पॉलिसी Lapse होत होत्या. तसे मेसेज कर्मचाऱ्यांना LIC कडून येत होते. त्यामुळे दुर्दैवाने कोणाचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला आणि हप्ते भरले नसल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचा क्लेम एल.आय.सी ने नाकारला तर याची जबाबदारी महामंडळ घेणार का? असा सवाल कर्मचाऱ्यांकडून विचारला जात होता. सदर पैसे लवकरात लवकर एलआयसी व पेंशन संस्थेला भरावेत असे पत्र दिनांक 26 एप्रिल 2021 रोजी मान्यताप्राप्त संघटनेकडून उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना देण्यात आले होते.

तसेच मान्यताप्राप्त एस.टी. कामगार संघटनेचे याबाबत आवाज उठवला होता. News18 लोकमतनेही यासंदर्भाती वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर कर्मचाऱ्यांचं महामंडळाने ऐकलं आहे. आणि तत्काळ दखल घेऊन सुमारे 15 कोटी रुपये पेन्शन व एल.आय.सी चे पैसे भरले आहेत. News18 लोकमत नेहमीच एसटी कर्मचाऱ्याच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहे. यंदाही त्यांच्या हक्कासाठी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

हे ही वाचा-ST कर्मचाऱ्यांची दैना; महामंडळाने आता कर्मचाऱ्यांचे LIC चे हप्तेही थकवले

काय आहे प्रकरणं?

एसटी महामंडळात मागील 4 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या पगारातून एलआयसीचे हफ्ते कट होत आहे. परंतु ते एलआयसीकडे जमा झालेच नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पॉलिसी लॅप्स होत असल्याचे मेसेज येत आहेत. कामगार संघटनांच्या माहितीनुसार तब्बल 2 कोटी रुपये महामंडळाने जमा केले नाहीत. त्यामुळे या काळात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची भरपाई एसटी महामंडळ कुठून करणार असा सवाल संघटनांनी उपस्थित केला होता.

First published:

Tags: LIC, St bus