NEWS18 EXIT POLL 2019 : पार्थची दिल्लीला जाण्याची इच्छा 'मावळ'णार, अजितदादांना बसणार धक्का?

NEWS18 EXIT POLL 2019 : पार्थची दिल्लीला जाण्याची इच्छा 'मावळ'णार, अजितदादांना बसणार धक्का?

मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आपलं नशीब आजमावून पाहत आहे.

  • Share this:

मावळ, 20 मे : पवार घराण्याची तिसरी पिढी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आपलं नशीब आजमावून पाहत आहे. परंतु, न्यूज 18 आणि IPSOS या संस्थेनं केलेल्या सर्व्हेमध्ये पार्थला पराभवाला सामोरं जावं लागणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या मतसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे 'दिल्ली' गाठणार अशी शक्यता आहे.

शरद पवारांची माघार

पार्थच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली. एकाच कुटुंबातले एवढे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नको, अशी शरद पवारांची भूमिका होती.

मावळ मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. यानंतर लगेचच 2009 मध्ये इथे निवडणूक झाली. त्यावेळी शिवेसेनेचे गजानन बाबर तिथून जिंकून आले. त्यानंतर 2014 मध्ये शिवसेनेच्याच श्रीरंग बारणे यांनी इथून निवडणूक जिंकली.

शेकापचा आघाडीला पाठिंबा

यावेळच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी दिली. इथे वंचित बहुजन आघाडीच्या राजाराम पाटील यांनाही तिकीट देण्यात आलं. त्याचबरोबर इथल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचीही भूमिका महत्त्वाची होती. शेकापने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीला पाठिंबा दिला होता.

मावळ लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यात पनवेल, मावळ, चिंचवड, उरण, पिंपरी आणि कर्जत मतदारसंघाचा समावेश आहे.

मागच्या निवडणुकीत सेनेला यश

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना घवघवीत यश मिळालं होतं. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या लक्ष्मण जगताप यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या स्थानावर होता. राष्ट्रवादीकडून तेव्हा राहुल नार्वेकर यांनी निवडणूक लढवली होती. इथे आम आदमी पार्टी चौथ्या क्रमांकावर होती.

29 एप्रिलला झालं मतदान

मावळमध्ये यावेळी चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. यावेळी इथे सुमारे 60 टक्के मतदानाची नोंद झाली.

=============================================

First published: May 20, 2019, 7:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading