पत्नीनंच केला सुपारी देऊन पतीचा खून

पत्नीनंच केला सुपारी देऊन पतीचा खून

चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून पत्नीनेच आपल्या पतीचा सुपारी देऊन खून केलाय. 2 लाखांची सुपारी देऊन हा खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 10 सप्टेंबर : चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून पत्नीनेच आपल्या पतीचा सुपारी देऊन खून केलाय.  2  लाखांची सुपारी देऊन हा खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय.  फोटोत दिसणारी ही उच्चशिक्षित भाग्यश्री होळकर.या भाग्यश्रीनं नवऱ्याची सुपारी देऊन हत्या केलीये.

भाग्यश्रीचा नवरा हा बँक मॅनेजर होता. तो सतत चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातून होणाऱ्या भांडणांना कंटाळून भाग्यश्रीनं नवरा जितेंद्रच्या हत्येची 2 लाखांची सुपारी दिली. ही सुपारी देताना किरण गणोरे यानं मध्यस्थ म्हणून भूमिका बजावली. तर फय्याज आणि बाबू यांनी जितेंद्रची घरात घुसून हत्या केली.

भाग्यश्रीनं जितेंद्रचा खून लुटीच्या उद्देशानं झाल्याचा बनाव रचला होता. पण औरंगाबाद पोलिसांनी अवघ्या 24 तासांत हा बनाव उघडकीस आणलाय.

First published: September 10, 2017, 5:53 PM IST

ताज्या बातम्या