नव्या कोरोना विषाणूबद्दल नागपुरातून चिंताजनक बातमी, संशयित रुग्णांची संख्या 5 वर

नव्या कोरोना विषाणूबद्दल नागपुरातून चिंताजनक बातमी, संशयित रुग्णांची संख्या 5 वर

नागपूरमध्ये आयर्लंडमधून आलेल्या 36 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. संशयित रुग्ण हा 25 नोव्हेंबरला आयर्लंड येथून दिल्लीत आला होता.

  • Share this:

नागपूर, 28 डिसेंबर : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा विषाणू सापडल्यामुळे (new coronavirus strain) खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातही खबरदारी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, नागपूरमध्ये (Nagpur) नव्या कोरोना स्ट्रेनच्या संशयिय रुग्ण संख्येत वाढ झाली असून संख्या 5 वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे.

नागपूरमध्ये आयर्लंडमधून आलेल्या 36 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.  संशयित रुग्ण हा 25 नोव्हेंबरला आयर्लंड येथून दिल्लीत आला होता. त्यानंतर रायपूरमध्ये लग्न समारंभात सहभागी झाला होता. लग्न सोहळा आटोपल्यानंतर ही व्यक्ती 14 डिसेंबरला नागपुरात दाखल झाली होती. अचानक कोरोनाची लक्षण आढळून आल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर 26 डिसेंबरला कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आढळला होता. या संशयित रुग्णाचे नमुने हे पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

तर दुसरीकडे, नागपूरचा महानगर पालिकचे वैद्यकीय आरोग्य अधिकारीही दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबल उढाली आहे. कोरोनाची लक्षण आढळल्यामुळे तपासणी करण्यात आली होती. त्यात रविवारी अहवाल हा पॉझिटिव्ह आढळून आला होता.

 गोव्यात पॉझिटिव्ह रूग्णांमुळे खळबळ

तर दुसरीकडे गोव्यात 9 डिसेंबर 20 डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांमधील आता 35 प्रवाशी पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे आरोग्य प्रशासन आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोज नव्याने कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे.

या दरम्यानच्या काळात  ब्रिटनवरून  979  प्रवासी भारतात आले होते.  नव्या नियामवलीप्रमाणे यातील 465 नागरिकांच्या  rt-pcr  चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी  35 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. इतरांच्या चाचण्या घेणे सुरू आहे सर्व 35 रुग्णांना आरोग्य प्रशासनाने स्पेशल कोविड रुग्णालयात ठेवले असून त्यांचे नमुने पुण्याच्या नॅशनल व्हायरालॉजी लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. याबाबत प्रशासन सतर्क झाले असून पुढील उपाय योजनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Published by: sachin Salve
First published: December 28, 2020, 9:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या