विलासरावांसाठी धीरजने सादर केली कविता, आईला अश्रू अनावर

विलासरावांसाठी धीरजने सादर केली कविता, आईला अश्रू अनावर

काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोन्ही मुलं अमित आणि धीरज यंदा विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहे.

  • Share this:

लातूर, 07 ऑक्टोबर : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दोन्ही मुलं अमित आणि धीरज यंदा विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहे. अमित आणि धीरज देशमुख यांच्यासाठी संपूर्ण देशमुख कुटुंब एकवटलं आहे. धीरज यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जेव्हा सभेत सांगितल्या तेव्हा वैशालीताई यांना अश्रू अनावर झाले.

लातूर ग्रामीण भागातील गावा-गावात जाऊन धीरज देशमुखांना निवडून द्यायचं आवाहन रितेश करत आहे. रितेशच्या सोबतीला जेनेलिया आणि पूर्ण देशमुख कुटुंबीय आहे. मोठ्या सभामध्ये संपूर्ण देशमुख कुटुंब एका मंचावर दिसतं आहे. तर विलासरावांच्या पत्नी वैशालीताई देशमुख या निवडणुकीत विशेष लक्ष घालतायत. कारण, त्यांचे दोन्ही सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवाय विलासरावांच्या आठवणी दोन्ही मुलांच्या भाषणातून व्यक्त केल्या तेव्हा वैशाली देशमुख यांना अश्रू रोखणं कठीण झालं.

लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख तर लातूर ग्रामीण मतदार संघातून धीरज देशमुख निवडणूक लढवत आहे. धीरज देशमुख यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून या अगोदर राजकारणाचे धडे गिरवले आहेत. वडील विलासराव देशमुख आणि मोठा भाऊ अमित देशमुख यांच्यामुळे धीरज राजकारण जवळून पाहिलं आहे.

धाकटा भाऊ निवडणुकीला पहिल्यांदाच उभा राहिला म्हटल्यावर रितेश देशमुखही लातुरात पोहोचला. त्याने उमेदवारी दाखल करण्यापासून ते गावा-गावातल्या प्रचारात पुढाकार घेतला आहे. विलासरावांमुळे काँग्रेसचा गड बनलेल्या या लातूर मतदारसंघात धीरज यांचं स्वागत होतंय. कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे.

=================================

First published: October 7, 2019, 5:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading