डोंबिवली, 19 मे : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. कोरोनाशी मुकाबला करत असताना नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी होमिओपॅथिक गोळ्या देण्याची सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली. परंतु, डोंबिवलीमध्ये या गोळ्यांचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
डोंबिवलीतील पश्चिम भागात होमिओपॅथिक गोळ्यांची धोकादायक पद्धतीनं पॅकिंग करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी 18 मे रोजी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या ARSENIC ALBUM 30 या होमिओपॅथिक गोळ्यांची विक्री कुठलीही स्वच्छतेची काळजी न घेता व अल्पवयीन मुलांकडून त्यांची पॅकिंग केली जात होती. डोंबिवली पश्चिम भागात एका मेडिकल दुकानात हा सगळा प्रकार सुरू होता.
मनसेचे कार्यकर्ते संकेत तांबे, केतन सावंत, वैभव रत्नपारखी यांनी या दुकान जाऊन सगळा प्रकार समोर आला. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सदरीलमेडिकल दुकान बंद केले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज FDA चे अधिकारी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी कारवाई करण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं.
हेही वाचा -डबल मर्डरचा LIVE VIDEO, समाजवादी पक्षाचे नेते आणि मुलावर भर दिवसा झाडल्या गोळ्या
दरम्यान, स्थानिक नगरसेवक कुणाल दिनकर पाटील यांनी पालिका प्रशासनाला पत्र लिहून 'मेडिकल असोसिएशन आणि आयुष मंत्रालयाला योग्य त्या सुचना देऊन मगच औषधाचे वाटप करावे, जेणेकरून कोणाच्या जीवावर काही दुष्परिणाम होणार नाहीत', अशी मागणी केली आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.